33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयझाल्या त्या गोष्टी झाल्या आता जोमाने काम करु ; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर...

झाल्या त्या गोष्टी झाल्या आता जोमाने काम करु ; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रीया

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ य़ा त्यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम्याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांचे सरकार पून्हा स्थापन केले असते, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाच्या निकालानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले की, माझ्या पुस्तकात स्पष्टपणे लिखाण केल्याने मित्रपक्ष नाराज झाले, त्यांना नाराज करण्याचा हेतू नव्हता तर ती वस्तूस्थिती होती. आज सर्वोच्च न्यायालयाने तीच गोष्ट व्यक्त केली असे सांगत आता झाले ते झाले, आम्ही, उद्धव ठाकरे, काँग्रेस जोमाने काम करायला सुरुवात करु असे पवार म्हणाले.

गेले 11 महिने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या खटल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने दिला. यावेळी न्यायालयाने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने त्यांचे सरकार पून्हा आणू शकत नसल्याचे सांगितले. तसेच राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप घेतले. दरम्यान शरद पवार यांनी या निकालानंतर पत्रकार परिषद घेतली.
यावेळी शरद पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने या निकालात विधिमंडळ पक्ष मान्य नसून जो राजकीय पक्ष आहे त्याचा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सांगितले. तसेच या खटल्यातील काही निर्णय अद्याप व्हायचे असल्याचे देखील पवार यांनी यावेळी सांगितले.

पवार म्हणाले, १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला असून हा निर्णय लवकर घेण्याचे देखील सांगितले आहे. विधानसभा अध्यक्ष त्यांची भूमिका घेतील तेव्हा आमचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडण्यात येईल असे देखील ते यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर खापर फोडणे ही कोर्टाने शोधलेली पळवाट !

गावठी दारुसाठी प्रसिद्ध असलेले राजापूर जलसमृध्द बागायती गाव झाले!

गोगावलेंचे प्रतोदपद बेकायदा ठरवल्याने ठाकरेंच्या आमदारांना बळ

विधानसभा अध्यक्ष हे संस्थात्मक पद आहे, त्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनी त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला हवी. त्याबाबत त्या लोकांनमध्ये किती आस्था आहे, हे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होईल असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी