31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरराजकीयशरद पवार मैदानात उतरले; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सज्जड इशारा

शरद पवार मैदानात उतरले; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सज्जड इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सिमावादाचा प्रश्न आता खुपच चिघळत चाचला आहे. कर्नाटकमध्ये महराष्ट्रातील वाहनांवर आज हल्ले करण्यात आले. त्यानंतर शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. मंगळवारी (दि. 6) शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सज्जड इशारा दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न आता खुपच चिघळत चालला आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर आज हल्ले करण्यात आले. त्यानंतर शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. मंगळवारी (दि. 6) शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सज्जड इशारा दिला आहे. पवार म्हणाले, महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला झाला. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून देखील त्याचा काहीही उपयोग झाला नाही. महाराष्ट्राच्या संयमाला देखील काही मर्यादा आहेत. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर संयमाची जागा वेगळी गोष्ट देखील घेऊ शकते. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असे पवार म्हणाले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्रीच चिथावणीखोर वक्तव्ये करून हल्ले घडवत असतील तर देशाच्या ऐक्यासाठी धोकादायक आहे. केंद्र सरकारने देखील बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी ही बाब केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर घालावी, अन्यथा महाराष्ट्रात कोणी कायदा हातात घेतल्यास त्याची जबाबदारी केंद्राची असेल.

पवार म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांचे मला मेसेज येत आहेत. समितीच्या कार्यकर्त्यांची कर्नाटक सरकारकडून चौकशी होत आहे. त्यांच्या कार्यालयासमोर बंदोबस्त आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. अशा परिस्थितीत तेथील मराठी भाषिक दहशती खाली जगत आहे. माझा सीमाप्रश्नाचा अभ्यास आहे, गेली अनेकवर्षे मी हा प्रश्न जवळून पाहिलेला आहे. तेथील लोकांकडून जी माहिती मिळत आहे, त्यावरुन परिस्थिती चिंताजनक असल्याची स्थिती आहे. हि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला हवी असे देखील यावेळी बोलताना पवार म्हणाले.
हे सुद्धा वाचा
शिवशक्ती-भीमशक्तीच्या नव्या प्रयोगाने महाविकास आघाडीत तिढा !
बिगबॉस फेम दिव्या अग्रवालची अपूर्व पाडगावकरसोबत एंगेजमेंट
शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची; सुनावणी आता पुढल्या वर्षीच !
— बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले
मंगळवारी बेळगावमध्ये महगाराष्ट्रातील पाच वाहनांवर कन्नडीगांकडून हल्ले करण्यात आले, हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पाच वाहनांवर हल्ला केला. यावेळी महाराष्ट्रातील वाहनांवर उभे राहून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान याप्रकऱणी कर्नाटक पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिका  संघटनेचा पदाधिकारी नारायण गौडाला अटक केली आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!