31 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरराजकीयAndheri East By Poll Election : मुंबईत होणार शिवसेना वि. शिंदेसेनेचा सामना...

Andheri East By Poll Election : मुंबईत होणार शिवसेना वि. शिंदेसेनेचा सामना ?

मे महिन्यामध्ये अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर आता या विधानसभेत पोट निवडणूक घेण्यात येणार आहे.

राज्यातील राजकीय समीकरणे गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णतः बदलेली आहेत. अडीच वर्षे महाविकास आघाडीमध्ये राहून सत्तेचा आनंद लुटलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी अचानक बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Shinde Group) यांच्या नेतृत्वात स्वतःचा वेगळा गट निर्माण केला. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करत राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन केले. असे याआधी राज्यात कधीही झाले नव्हते आणि आता जे काही घडत आहे ते महाराष्ट्र राज्यासाठी भविष्याच्या दृष्टीने अत्यंत भीषण असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान आता मुंबईतील 36 विधानसभांपैकी एक असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये लवकरच उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मे महिन्यामध्ये अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर आता या विधानसभेत पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून या विधानसभेतून कोण निवडणूक लढवेल याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसली तरी, एकनाथ शिंदे यांच्या गटातून मात्र मुरजी पटेल यांचे नाव समोर येत आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने युतीमध्ये या निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी भाजपने ही जागा शिवसेनेसाठी राखीव ठेवली होती. तेव्हा या विधानसभेतून दुसऱ्यांदा रमेश लटके हे विजयी झाले. पण तीन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले आणि या विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे येत्या काही महिन्यात या विधानसभेमध्ये पोट निवडणूक होऊ शकते.’

हे सुद्धा वाचा

Dahi Handi 2022 : मुंबईतील गोविंदाच्या मृत्यूनंतर सरकारने दहिहंडीबाबत घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न

Sushma Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणतात राज साहेब म्हणजे कोण?

Sanjay Raut Business Partner Booked : संजय राऊतांना धक्का, सुजित पाटकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

दरम्यान, पोट निवडणुकीसाठी या विधानसभेतून 2019 चे अपक्ष उमेदवार मुरजी पटेल हे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पण याआधीच भाजपने या मतदारसंघाच्या बांधणीचे काम आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवले होते. त्यामुळे भाजप आता पुन्हा एकदा त्यांच्या नजरेतील खऱ्या शिवसेनेसाठी अर्थात एकनाथ शिंदे गटासाठी ही जागा रिक्त ठेवतात का ? हे पाहावे लागणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या कधीही जाहीर होऊ शकतात. पण त्याआधी जर अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक जाहीर झाली तर मात्र या विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असा सामना रंगू शकतो. मुंबई मनपाच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध शिंदेसेना यामध्ये ट्रायल सामना होतो की नाही हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी