33 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीयदादरमध्ये शिंदे-ठाकरे गटात फेसबुक पोस्टवरून हमरातुमरी

दादरमध्ये शिंदे-ठाकरे गटात फेसबुक पोस्टवरून हमरातुमरी

शिंदे गटाने एका वर्षापूर्वी बंड करून भाजपला सोबत घऊन सत्ता स्थापन केली. या सत्तेला एक वर्ष पुर्ण झाले असून आजही त्यांच्यात वाद पाहायला मिळतो. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडत असतात. एवढेच नाही तर आता शिंदे आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते, शाखाप्रमुख तसेच उपशाखाप्रमुख यांच्यात स्थानिक पातळीवर वाद झालेला पाहायला मिळत आहे. ही घटना दादर येथील असून हा वाद एका फेसबुक पोस्टवर केलेल्या टिप्पणीचे निमित्त आहे. हा वाद ठाकरे गटाचे दादारचे उपशाखाप्रमुख संदीप पाटील आणि शिंदे गटाच्या विभाग संघटिका प्रिया सरवणकर-गुरव यांच्यात झाला.

छत्रपती शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यात सभा घेण्यासाठी ठाकरे गट सज्ज झाला आहे. यावरूनच मागील वर्षी दोन्ही गटात वाद झाले होते. यंदाही दादारमधील शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये एक फेसबुक पोस्टवरून वाद झाला आहे. शिंदे गटाने छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. यावेळी हा अर्ज फेटाळण्यात आला होता. यावरून दादारचे आमदार सदा सरवणकर यांची कन्या आणि शिंदे गटाच्या विभाग संघटिका प्रिया सरवणकर-गुरव यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती त्या पोस्टवर दादर शिवसेना शाखा उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी ‘उशिराने आलेले शहाणपण’ अशी टिप्पणी केली होती, यामुळे हा वाद वाढला आहे.

हेही वाचा 

महादेव, टोकरे, मल्हार कोळयांच्या जात प्रमाणपत्रासाठी नीलम गोऱ्हे आग्रही

टीम इंडियाकडून विजयाची ‘आठवी माळ’, पाकिस्तानचा दणदणीत पराभव

मंत्री अतुल सावेंच्या विभागाची कामगिरी न्यारी! कोट्यवधीच्या योजनांचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ

पोलिसात तक्रार 

संदीप पाटील यांच्या टिप्पणीवर प्रिया सरवणकर यांनी संदीप पाटीलला घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. या धमकीवरून आता संदीप याने दादर येथील पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे. दादर पोलिस आयुक्त संदीप भागडीकर यांना लेखी तक्रार अर्ज देण्यात आला आहे. यावर कायदेशीर तक्रार केली जाईल अशी माहिती दादर पोलिसांनी दिली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी