28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरराजकीयविदर्भात शिंदे गट शिवसेना फोडणार? 'मिशन विदर्भ' लवकरच सुरू

विदर्भात शिंदे गट शिवसेना फोडणार? ‘मिशन विदर्भ’ लवकरच सुरू

टीम लय भारी

नागपूर : महाराष्ट्रातील जनमानसांत लोकप्रिय असणाऱ्या शिवसेनेची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. शिवसेनेतच दोन गट पडल्यामुळे जनता पुरती बुचकळ्यात पडली आहे. परंतु त्यातील शिंदे सेनेची क्रेझ सध्या जोरात चालू असल्याने केवळ नेतेमंडळीच नव्हे तर सामान्य शिवसैनिक सुद्धा शिंदे गटात सामील होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आता ‘मिशन विदर्भ’ सुरू केले असून विदर्भ सुद्धा ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत.

शिवसैनिकांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी शिंदे गटाकडून मिशन विदर्भ सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त शिवसैनिकांना गटात सामील करून घेतले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचे मानसपुत्र असलेल्या किरण पांडव यांच्यावर पूर्व विदर्भात हे मिशन राबवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

बंडानंतर शिंदे गटाकडून शिवसेना स्वतःची करून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. धक्क्यावर धक्के देत शिवसेनेला खिळखिळी करण्याचे काम सध्या या गटाकडून करण्यात येत आहे.

राज्यातील राजकीय वर्चस्व स्थापनेसाठी शिंदे गटाकडून मिशन विदर्भ ही मोहिम राबवण्यात येणार असून विदर्भातील जास्तीत जास्त शिवसैनिकांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी गटाकडून मोहिमेची पद्धतशीरपणे आखणी करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शिवसैनिकांना सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

दरम्यान, या मिशन अंतर्गत गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यात मोठ्या संख्येने सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

शिंदे गटाचे भविष्य आज ठरणार? खंडपीठाची आज महत्त्वपूर्ण सुनावणी

काळजी घ्या! कोरोनानंतर वाढले आता ‘स्वाईन फ्लु’चे संकट

भूकंपाने हादरले मुळशी 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!