नुकतेच राज्यात स्थापन झालेले महायुतीचे सरकार त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि आता सुरु असलेले हिवाळी अधिवेशन. या सगळ्यांचा चांगलाच ताळमेळ लागलेला असताना कालच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आणि दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.(Shinde’s criticism on Thackeray-Fadnavis meeting)
हिवाळी अधिवेशनासाठी गेलेलया एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारला गेला. यावर शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना भेटणं गैर नाही पण निवडणुकीपूर्वी टोकाची टीका टाकणारे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे, अगदी संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये एक आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे. आणि शेवटी याला भेट, त्याला भेट आणि दुसर्या दिवशी घरी थेट अशी ही परंपरा आहे म्हणत त्यांनी चांगलाच टोला लगावला आहे.(Shinde’s criticism on Thackeray-Fadnavis meeting)
त्यानंतर ईव्हीएम वर बोलणाऱ्यानी बाहेर बोलण्यापेक्षा सभागृहात बोलावे असेही ते म्हणाले. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही त्या यंत्रणेचा उदो उदो करता असे म्हणत “जेव्हा महाविकासआघाडीच्या बाजूने निकाल लागतो, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं. निवडणूक आयोग चांगलं असतं. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टही चांगलं असतं. जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा मग ते ईव्हीएमवर आरोप करण्याचे काम करतात. गेल्या काही दिवसांपासून विरोधक हेच करत आहेत. असे एकनाथ शिंदे म्हणाले. (Shinde’s criticism on Thackeray-Fadnavis meeting)
पुढे एकनाथ शिंदे काँग्रेसने जनादेशाचा अपमान करू नये असे म्हणत उद्धव ठाकरेंनी केलेली मागणी हास्यास्पद आहे. हे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान करण्यासारखे आहे. हे घटनात्मक पदाबद्दल बोलणे योग्य नाही. नाहीतर जनता घरी बसवेल, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.