27 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरराजकीयशिवसेनेला पुन्हा फटका; हजारो कार्यकर्त्यांनी धरली शिंदेगटाची वाट

शिवसेनेला पुन्हा फटका; हजारो कार्यकर्त्यांनी धरली शिंदेगटाची वाट

टीम लय भारी

सोलापूर : एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत दोन गट दिसायला लागले आहेत. शिवसेनेचा खरा वारसदार यावर हक्क सांगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या नावाची ढाल वापरून शिंदे गटाची शिवसेना विरुद्धच्या कुरघोडी सुरूच आहेत. दरम्यान पुन्हा एकदा शिंदे गटाने शिवसेनेला जोरदार झटका दिला आहे. सोलापुरातील हजारो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटाची वाट धरली आहे.

संपुर्ण राज्यात शिंदे गटाचा दबदबा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे सेनेला आपला पाठिंबा दर्शवत आहेत, तर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेला डच्चू देत शिंदे गटात सामील होत आहेत.

दरम्यान, सोलापुरातील हजारो कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटाला पाठींबा दर्शवला आहे. आमदार तानाजी सावंत यांचे मुळ गाव वाकाव गावातून तसेच माढा, मोहोळ, पंढरपुर तालुक्यासह कुडूवाडी शहरातील हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाचा गजर करीत शिंदे गटात प्रवेश केला, यावेळी महिलांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती.

आमदार तानाजी सावंत यांच्या वाकाव येथील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. येत्या काही दिवसांतच एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकत्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

हिंदुत्व अबाधित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गट शिवसेनेवर भारी पडणार का हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

पेट्रोल डिझेल स्वस्त झाले ! बघा…आता…काय काय महाग झाले…..

पुण्यातील आगीत उद्धवस्त झालेल्या पीडितांच्या हाकेला डाॅ. अमोल कोल्हे यांची साद

देवेंद्र फडणवीसांचे माईक प्रेम आणि बरेच काही…

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!