30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयनिवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना आमदाराचा इशारा...

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना आमदाराचा इशारा…

निवडणूक आयोगाने शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात आपले वजन टाकत ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्य बाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. त्यांनतर एकनाथ शिंदे यांच्या गोटात विजयोत्सव साजरा करण्यात आला. तर या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गोटात उदासीनता पसरली. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे कोणती चाल रचतात या चर्चेला राजकीय वर्तुळात आता उधाण आले आहे. पण या पराभवाने खचून न जाता गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही शिलेदार पुढे सरसावले आहेत. खबरदार गाठ निष्ठावंतांशी आहे… आम्ही अद्याप हार पत्करली नाही… यापुढेही अभिमानाने लढू… असा निश्चय आता शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. ट्विटरवर त्यांनी गद्दारांना इशारा दिला आहे. छोट्या लढाईतील विजयाने उन्मत्त होऊ नका, गाठ आमच्याशी आहे… असेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांना सूचित करायचे आहे. (Shiv Sena MLA’s Warning After Election Commission’s Result…)

एकनाथ शिंदे यांच्यासह काही फुटीर आमदार सुरुवातीला सुरतला गेले होते त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. विधान परिषदेचे मतदान संपल्यानंतर जेवणाचे निमित्त करत वेगवेगळ्या वाहनांतून या आमदारांना सुरतला नेण्यात आले होते. या आमदारांना घेऊन सायंकाळी बस ठाण्याच्या दिशेने रवाना झाली. ठाणे गेल्यानंतरही ही वाहने वेगाने पुढे चालली होती. त्यामुळे कैलास पाटील यांच्या मनात शंका निर्माण झाली. अखेर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर वाहने थांबली. लघुशंकेचा बहाणा करत कैलास पाटील तेथून निसटले आणि भर पावसात मुंबईच्या दिशेने चालू लागले. तेथून मोटोरसायकलस्वाराकडे लिफ्ट मागितली नंतर ट्रकने दहिसर गाठले. तेथून त्यांच्या खासगी वाहनाने थेट वर्ष बंगला गाठला. हेच ते उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या व्यथा परखड शब्दांत मांडल्या आहेत. त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काव्यपंक्ती उद्धृत केल्या आहेत. त्यांनी न्यायव्यवस्थेवरच नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आम्ही अद्याप शरणागती पत्करलेली नाही, अजूनही लढाई सुरूच राहील, असा गर्भित इशाराच उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी दिला आहे. एखाद्याकडून कपटनितीने तुम्ही त्याची राजवस्त्रे, अधिकार, सत्ता हे सारे काही हिरावून घेऊ शकता पण त्यांची उमेद हिसकावून घेऊ शकत नाही, असेच या निष्ठावंतांना जणू काही सुचवायचे आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेंनी ओळखले ‘जबाबदारीचे भान’

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला

यंदा आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर; प्रथमच होणार ‘दिवाण-ए-आम’ मध्ये शिवजयंती उत्सव

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी