34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeराजकीयNavneet Rana : नवनीत राणांना 'तोंड सांभाळण्याचा'‍ शिवसेनेचा इशारा

Navneet Rana : नवनीत राणांना ‘तोंड सांभाळण्याचा’‍ शिवसेनेचा इशारा

अमरावतीच्या नवनीत राणांचे सगळे लक्ष मुंबईत असते. कारण त्या बराच काळ मुंबईत वास्तव्यास होत्या. मात्र अभिनेत्री असलेल्या नवनीत कौर राणा यांनी राजकारणात प्रवेश केला आणि समाजमाध्यमांमध्ये तुफान प्रसिद्धी मिळाली.

अमरावतीच्या नवनीत राणांचे सगळे लक्ष मुंबईत असते. कारण त्या बराच काळ मुंबईत वास्तव्यास होत्या. मात्र अभिनेत्री असलेल्या नवनीत कौर राणा यांनी राजकारणात प्रवेश केला आणि समाजमाध्यमांमध्ये तुफान प्रसिद्धी मिळाली. त्या सतत भाजपच्या बाजूने बोलत असतात आणि शिवसेनेवर आणि नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांच्या बडबडीवरुन शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार असे वक्तव्य करुन स्वत:ला किरकोळ प्रस‍िद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवनीत रणांचा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

संजना घाडी म्हणतात. ‘नवनीत राणा (Navneet Rana) जरा तोंड सांभाळून….कोण आहात आपण ‘सी’ ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या.. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. काय संबंध आपला हनुमान चालीसा शी…. हनुमानाला हनुमान का म्हणतात ? याचं साधं उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आले नाही… म्हणजे मी हनुमान भक्त भाजपच्या सी…डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं…..तुम्ही डायरेक्टर मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात…. ज्या बाईला लाखो शिवसैन‍िकांचे श्रद्धास्थान असलेले मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही. त्या बाईला कशी वागणूक मिळायला पाहिजे होती.

तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली वगैरे वगैरे….. म्हणून मातोश्री आण‍ि मातोश्रीचे विचार हिंदुत्त्ववादी राहिलेले नाहीत…. बाळासाहेबांचे राहिले नाहीत….पण याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लिम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी नमाज अदा केली होती…. हे तुम्ही मुंबईची मुलगी म्हणून तुमच्या सारख्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी C ग्रेड फ‍िल्म करण्यात बिझी होती आणि आता फड उभा करुन कमळाबाईची सुपारी वाजवते….. हे महाराष्ट्र आणि मुंबईल‍ा पक्के माहित आहे… कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई…! त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्या वर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही.

अशा फाजील वल्गना करुन थेर महाराष्ट्राला दाखवू नका… शिवसेना ही कालची मजबूत होती. आजही मजबूत आहे आणि तुमच्या सारख्या 100 दुश्मनांच्या छाताडवर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांची नाक कापून असे शिवसेना उपनेता व प्रवक्ता संजना घाडी म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांना मिळणार सडलेले मासे !

Maharashtra Politics : भाजप नेता म्हणतो, निवडणुका जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ करावे…

Congress: काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांना धक्का!‍

अशा प्रकारे राजकारणात आरोप प्रत्यारोपांना पेव फुटले आहे. निवडणुकांमध्ये याची पुढची पायरी काय असेल ते येणारा काळच ठरवेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी