34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयठाकरे गटाला आणखी एक धक्का; शिवसेनेचे ट्विटर अकाऊंट, अधिकृत वेबसाईटला लागले ग्रहण!

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शिवसेनेचे ट्विटर अकाऊंट, अधिकृत वेबसाईटला लागले ग्रहण!

भारतीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून घोषित केले आहे. यासोबतच उद्धव ठाकरेंकडून ‘धनुष्यबाण’ ही ओळख म्हणजेच पक्षचिन्ह सुद्धा काढून घेतले. त्याचा परिणाम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसून आला. जिथे तत्कालीन शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नाव बदलल्यानंतर ट्विटरकडून त्याचे ब्लू टिक म्हणजेच अधिकृत व्हेरिफिकेशनसुद्धा काढून टाकण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव गटाने त्यांचे ट्विटर हँडल बदलून @ShivsenaUBT_ असे केले होते. त्यामुळे पक्षाची ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय युट्यूबवरही ठाकरे गटाने नाव बदलले आहे. ट्विटरवर पक्षाचे नाव @ShivsenaUBTComm झाल्यानंतर पक्षाच्या अधिकृत मीडिया हँडलची ब्लू टिक काढून टाकण्यात आली. त्याचप्रमाणे पक्षाचे अधिकृत संकेतस्थळही हटवण्यात आल्याचे वृत्त आहे.

Maharashtra: ठाकरे गुट की शिवसेना ...

त्याचप्रमाणे, शिवसेनेची अधिकृत वेबसाईट Shivsena.in यावर क्लिक करताच ही वेबसाईट ओपन होत नसली तरी शिवसेनेच्या (ठाकरे) ट्विटर अकाउंटवर अद्याप ती लिंक आहे.

ठाकरे गटाकडून चालवण्यात येत असलेल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्हीही हटवले गेले आहे. त्याचप्रमाणे ट्विटर प्रोफाइल नाव बदलून शिवसेना उद्धव-बाळासाहेब ठाकरे असे करण्यात आले आहे. तर, मशाल हे चिन्ह ठेवण्यात आले आहे. त्यानंतर लगेच त्याची ब्ल्यु टिक काढण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, Shivsena.in हे डोमेन असलेली ही वेबसाईट हॅक केली अशी चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात होती. पण ठाकरे गटाकडूनच ती बंद करण्यात आल्याच सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नावामुळे कॅडर तसेच लोकांमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे. नियमांच्या आधारे, ट्विटरवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे, आम्ही पुन्हा प्रमाण तपासणीसाठी अर्ज केला आहे आणि तो लवकरच होईल, अशी माहिती आहे.

हे सुद्धा वाचा : आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, प्रकाश आंबडेकर यांची ग्वाही

निवडणूक आयोग मोदींचा गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

धनुष्य-बाण, शिवसेनेसाठी २००० कोटींचा सौदा ; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी