33 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरराजकीयदादरचे शिवसेना भवन ठाण्यात स्थलांतरित

दादरचे शिवसेना भवन ठाण्यात स्थलांतरित

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्य-बाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्यानंतर दादरमधील शिवसेना भवनचा ताबादेखील शिंदे गटाकडे जाणार अशा वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या. पण आता तर शिवसेना भवनच ठाण्यात स्थलांतरीत झाले आहे. दादर येथील शिवसेना भवन हा बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या केलेल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता सर्वश्रुत आहे. मात्र, अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिलेले दादरमधील शिवसेना भवन यापुढे मध्यवर्ती कार्यालय राहणार नसल्याचेच एकनाथ शिंदे यांनी सूचित केले आहे. (Shivsena Bhavan shifted to Thane) यापुढे ठाण्यातील आनंदाश्रम हे शिवसेनेचे नवीन मध्यवर्ती कार्यालय म्हणून ओळखले जाणार आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ठाण्यातील आनंदाश्रम हा शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता म्हणून नमूद करण्यात आला आहे. यापुढे आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना असे न म्हणता शिवसेना म्हणूनच संबोधित करा, असेही या पत्रकात म्हंटले आहे.

Shivsena Bhavan shifted to Thane

शिवसेना सचिव संजय मोरे यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात बाळासाहेबांची शिवसेना ऐवजी आमचा उल्लेख शिवसेना असा करावा, असे नमूद करण्यात आलं आहे. तसेच हे पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आल्याचे सूचित केले असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, आनंद आश्रम ठाणे असा आहे. आत्तापर्यंत शिवसेनेचा सर्व कारभार दादर येथील मध्यवर्ती कार्यालयातूनच व्हायचा मात्र ते कार्यालयच आता ठाणे येथे स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या दादर येथील नव्हे, तर ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयातून म्हणजेच आनंद आश्रममधूनच शिवसेनेचा कारभार पाहतील हे उघड होत आहे.

एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना भवनबाबत आपली भूमिका या आधीच स्पष्ट केली आहे. शिवसेना भवनबाबत आपले भावनिक नाते असून त्यावर आम्ही हक्क सांगणार नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन उभारलं आहे. हे शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. त्यामुळे त्यावर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

Shivsena Bhavan shifted to Thane

मुंबईतील दादर येथील शिवसेना भवन या कार्यालयाचा ताबा उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. शिवाई ट्रस्टच्या नावावर हे कार्यालय आहे. ट्रस्टचे अध्यक्ष लीलाधर डाके आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठी माणूस आपली गाऱ्हाणी घेऊन शिवसेना भवनावर यायचे. या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास त्यांना वाटायचा. तसेच, शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’, ‘मार्मिक’ साप्ताहिक हे प्रबोधन प्रकाशन या पब्लिक लिमिटेड संस्थेचे असल्यामुळे त्या दोन्हींची मालकीची उद्धव ठाकरे गटाकडेच राहाणार आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांची ‘सामना’ कार्यालयात घुसून दमदाटी

फुकटचे बुडबुडे फोडू नका, ५६ इंचाची छाती काय असते ते जावेद अख्तरांकडून शिका! ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

शिवसेना मुख्यनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड; शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्णय

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी