28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरराजकीयShivsena Crisis : आणखी दोन शिलेदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

Shivsena Crisis : आणखी दोन शिलेदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर संदिपान भुमरे पहिल्यांदाच शनिवारी पैठण शहरात आले. त्यावेळी त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी आणखी दोन शिलेदार शिवसेना सोडून जाणार असल्याचा खळबळजनक दावा भुमरे यांनी केला. त्यामुळे ठाकरे यांची साथ कोण सोडून जाणार याबाबत कमालीची उत्सुकता आता ताणली गेली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारला आणि शिवसेनेत मोठी फूट पडली. मोठे रथी – महारथी सेनेला रामराम करीत शिंदे गटात जाण्यात धन्यता मानू लागले, तरीही शिवसेनेची घडी पुन्हा एकदा नीट बसवण्यासाठी आदित्य ठाकरे  आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या बदलाची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आह, परंतु या संपुर्ण घडामोडी चालू असताना उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे आणखी दोन शिलेदार त्यांना सोडून जाणार असल्याचा खळबळजनक दावा संदिपान भुमरे यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे यांची साथ कोण सोडून जाणार याबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे.

पैठण येथे शनिवारी एका कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संदिपान भुमरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत शिवसेनेतील दोन आमदार फुटणार असल्याचे सूचक वक्तव्य केले. भुमरे यांच्या दाव्याने शिवसेनेची चिंता आणखी वाढली आहे. उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात आहे असे म्हणून संदिपान भूमरे यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

हे सुद्धा वाचा…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून नितेश राणेंचे कौतुक म्हणाले, यह आमदार ‘कामदार’ है

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष‍ चंद्रशेखर बावनकुळे 30 ऑगस्टला मुंबईत कार्यकर्त्यांना भेटणार

VIDEO : उदय सामंत यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठकारेंची डोकेदुखी आणखी वाढणार !

आदित्य ठाकरे यांच्या पैठण येथील शिवसंवाद यात्रेसाठी होणारी मोठी गर्दी यावर टीका करीत संदीपान भुमरे म्हणाले, पैठणच्या बिडकीन गावात आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या सभेपेक्षा गारुड्याच्या खेळाला जास्त गर्दी होते असे म्हणून भुमरे यांनी थेट आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली. यावर प्रत्युत्तर देत शिवसेनेने भुमरे यांना यावेळी चांगलेच फैलावर घेतले. यामध्ये विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी रिकाम्या खुर्च्यांचे फोटो पोस्ट करत ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी ‘देश भ्रमंती’ करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती!’ असे म्हणून दानवे यांनी भुमरे यांना मिश्किल टोला लगावला.

दरम्यान, कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर संदिपान भुमरे पहिल्यांदाच शनिवारी पैठण शहरात आले. त्यावेळी त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, भुमरे समर्थकांकडून याबाबत जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली परंतु या कार्यक्रमाला मोजके लोक सोडता कोणी फिरकले सुद्धा नाही त्यामुळे संदिपान भुमरेंची सोशल मीडीयावर विरोधी पक्षाकडून चांगली शाब्दिक धुलाई सुरू झाली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी