28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeराजकीयShivsena Leader Murder : भरदिवसा शिवसेना नेत्याची हत्या! अज्ञातांकडून गोळीबार

Shivsena Leader Murder : भरदिवसा शिवसेना नेत्याची हत्या! अज्ञातांकडून गोळीबार

पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांची जाहीरपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळी लागली तेव्हा सुरी मंदिराबाहेर धरणे धरत होते.

पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांची जाहीरपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळी लागली तेव्हा सुरी मंदिराबाहेर धरणे धरत होते. गोपाळ मंदिराबाहेरील कचऱ्यात देवांच्या मूर्ती आणण्यासाठी ते येथे धरणे धरत बसल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान गर्दीत कोणीतरी त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर सुरी हे टाकसाळीतील शिवसेनेचे प्रमुख होते. मंदिराबाहेरील कचऱ्यात सापडलेल्या देवतेच्या मुर्त्या पाहून ते संतापले आणि इतर नेत्यांसह आंदोलन करत होते. यादरम्यान काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अमृतसर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

सुरी हे व्यवसायाने ट्रान्सपोर्टर होते आणि देशद्रोही घटकांविरुद्ध आवाज उठवत होते. याआधी गुरुवारीही (3 नोव्हेंबर) शिवसेना नेत्याच्या घराजवळ गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. येथील टिब्बा रोडवरील ग्रेवाल कॉलनीतील पंजाब शिवसेना नेत्या अश्विनी चोप्रा यांच्या घराजवळ दोन सायकलस्वारांनी कथित गोळीबार केला. घराबाहेर लावलेल्या क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेऱ्यात (सीसीटीव्ही) घटनेचा व्हिडिओ कैद झाला आहे.

हे सुद्धा वाचा

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना ‘टीकली’वरील वक्तव्य भोवणार? राज्य महिला आयोगाने बजावली नोटीस!

Pune News : गजा मारणे टोळीला मोठा धक्का; फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai News : मुंबई पुन्हा हाय अलर्टवर; हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट

ते मंदिर प्रशासनाचा निषेध करत होते
मंदिराच्या आवाराबाहेरील डस्टबिनमध्ये काही तुटलेल्या मूर्ती सापडल्यानंतर शिवसेना नेत्यांनी मंदिर प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनादरम्यान काही अज्ञात लोकांनी सुरीला गोळ्या झाडल्या. त्यांचे काही समर्थक त्यांच्याजवळ गेले तर काही जण हवेत गोळ्या झाडताना दिसले.

आक्षेपार्ह भाषेमुळे चर्चेत आले होते
या वर्षी जुलैमध्ये एका विशिष्ट समुदायाविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि धार्मिक भावना भडकावल्याबद्दल सुरी यांना अटक केल्यानंतर ते चर्चेत आले होता. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये ते त्यांच्या काही सहकाऱ्यांसह समाजाविरुद्ध आक्षेपार्ह शब्द बोलताना ऐकू येतो.

दरम्यान, या हत्येतील आरेपींबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नसली तरी याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली असल्याची आणि संशयित आरोपीकडून शस्त्रे जप्त केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शिवाय याप्रकरणात लवकरच खुलासा केला जाईल आणि संपूर्ण माहिती उघड केली जाईल अशी माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी