27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरराजकीयशिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार

राज्यात एका वर्षांपूर्वी शिवसेना पक्षातील 40 आमदारांनी बंड केला आणि सरकारशी युती करत सरकार स्थापन केले. यामुळे शिवसेनेत दोन गट झाले. निवडणूक आयोगाने खरी शिवसेना ही शिंदे गटाची आहे, तर पक्षाचे चिन्ह देखील शिंदे गटाचे असल्याचे सांगितले. या निर्णयाविरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अशावेळी या याचिकेत शिवसेनेचे 16 आमदार हे अपात्र असल्याचे सांगितले होते. यामुळे याबाबत पुढील सुनावणी ही 13 ऑक्टोबरला होणार असल्याचे सांगितले होते. मात्र ही सुनावणी 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता होणार असल्याची माहिती आता समोर येत असून त्याचे कारणही आता समोर आले आहे.

20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाणार आहेत. यामुळे सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वेळापत्रकातील बदलामुळे राजकीय चर्चेला उधाण येऊ लागले आहे. याआधी देखील राहुल नार्वेकर यांनी सुनावणीच्या वेळापत्रकात बदल केला होता आणि त्यांना न्यायालयाने सुनावले होते. आज होणाऱ्या सुनावणीत शिवसेना अपात्रतेसंबंधी एकूण 40 याचिका विधानसभा अध्यक्षांकडे आहे. यामुळे या सर्व याचिकांवर एकदाच सुनावणी करा अशी मागणी आता शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेबद्दल नाबाम रेबिया केस लॅंडमार्क जजमेंट असून माझा निर्णय महाराष्ट्राला न्याय देणारा असेल, असे राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

हेही वाचा 

ड्रग्ज माफिया भूषण पाटीलला यूपीमधून अटक, ठाकरे गटाकडून दादा भुसेंवर आरोप

समीर वानखेडेंना ‘या’ देशातून आली धमकी, मुंबई पोलिसांकडे केली तक्रार

‘महाराष्ट्राचा उडता पंजाब करू नका’, ड्रग्ज तस्करीवरून पटोले सरकारवर बरसले

आजच्या सुनावणीनंतर राहुल नार्वेकर हे दिल्ली दौऱ्यासाठी जाणार आहेत. सुनावणीआधी दिल्लीत कायदेशीर चर्चा होणार होणार असल्याचे चित्र पाहायला मिळेल. शरद पवार गट आणि ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी लांबवत असल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे आता नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणी वेळापत्रकाबाबतची माहिती समोर आली आहे.

आमदार अपात्रतेचे सुनावणी वेळापत्रक

आमदार अपात्रतेबाबत 12 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे. तर 23 नोव्हेंबरनंतर पुढील सुनावणी ही दोन आठवड्यात करण्यात येणार आहे. तर एकूण 40 याचिका आहेत, तर या याचिकांवर एकदम सुनावणी घेण्याबाबत ठाकरेंची मागणी आहे, याबाबत उद्या सुनावणी होईल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी