27 C
Mumbai
Thursday, December 7, 2023
घरमहाराष्ट्रबुलढाणा लोकसभेवर शिवसेनेचा दावा, संजय गायकवाडांचे थेट भाजपला आव्हान

बुलढाणा लोकसभेवर शिवसेनेचा दावा, संजय गायकवाडांचे थेट भाजपला आव्हान

शिवसेना आमदार संजय गायकवाड हे थेट बोलण्यासाठी ओळखले जातात. शिवाय त्यांचा स्वभावदेखील आक्रमक आहे. त्यामुळे भाजपसोबत सत्तेत असूनही त्यांना कधी राजकीय भूमिका घ्यावी, याची जाणीव बहुधा झालेली नाही. हे सांगण्याचं कारण म्हणजे त्यांचं हे नवं वक्तव्य. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याची लोकसभेची जागा शिवसेनेकडेच असणार, असा दावा केला आहे. एवढंच नाही तर विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा उमेदवारी न दिल्यास आपण लोकसभेच्या रिंगणात उतरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावरून बुलढाण्यातील शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवर भाजपचा डोळा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

वास्तविक शिवसेनेचे प्रतापराव जाधव सलग तीन वेळा बुलढाणा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. पण भाजपच्या सर्वेक्षणात बुलढाणा लोकसभेची जागा चार क्रमांकावर दाखवण्यात आली आहे. म्हणजे प्रतापराव जाधव विजयी होऊ शकणार नाहीत. नेमकी हीच बाब शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना खटकली आहे. त्यांनी थेट भाजपला आव्हान दिलं आहे. प्रतापराव जाधवांना उमेदवारी न दिल्यास ती जागा मी लढवेन आणि जिंकेनही, असा दावा संजय गायकवाड  यांनी केला आहे. काहीही झालं तरी बुलढाण्याची जागा शिवसेनेकडेच राहिली पाहिजे, यावर आमदार संजय गायकवाड ठाम आहेत.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर भाजपला लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभेसाठी राज्यात भाजपने मिशन ४५  ठरवलं आहे. त्यासाठी यापूर्वीच सर्वेक्षण करून काही केंद्रीय मंत्र्यावर लोकसभेच्या जागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्याप्रमाणे अनुराग ठाकूर यांनी कल्याण-डोंबिवलीचे दौरे केले आहेत. तर निर्मला सीतारामण यांनीही बारामतीचा दौरेा केला आहे. हे लक्षात घेऊनच संजय गायकवाड यांनी एकदम आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे बुलढाण्याच्या लोकसभा उमेदवारीवरून भाजप-शिवसेनेत तुतू-मैंमैं होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचा सरपंच ते खासदार असा प्रवास आहे. १९९५ मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यानंतर १९९९ आणि २००४ मध्ये विजयी होत त्यांनी आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केली. पुढे २००९ मध्ये त्यांना शिवसेनेनं थेट खासदारकीचं तिकीट दिलं. ते खासदार झाले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांची विजयी घौडदौड सुरूच राहिली. असं असताना भाजपच्या सर्वेक्षणाच्या यादीत प्रतापराव जाधवांची जागा चौथ्या स्थानावर गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे ही वाचा

आम्हीही जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलवू पण, कार्यक्रम दिवाळीचा नसेल

मुकेश अंबानींकडून नीता अंबानींना ‘कोटी’मोलाची दिवाळी भेट

ललित पाटीलची प्रकृती पुन्हा बिघडली…

या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जाग भाजपला देणार नाही आणि इथून प्रतापराव जाधवच निवडणूक लढवतील, असं संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. जर प्रतापराव जाधव जर निवडून येत नसतील तर आम्ही ही जागा लढायला तयार आहोत. माझा सर्व्हे करा, मग तुम्हाला समेजल की नक्की काय आहे. यावर अजून भाजपकडून कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, बुलढाण्यातील जागेवरून भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडू शकते, अशी शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी