30 C
Mumbai
Friday, August 11, 2023
घरराजकीयShivsena Vs Congress : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला द्या, अशोक चव्हाण...

Shivsena Vs Congress : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला द्या, अशोक चव्हाण यांची मागणी

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येवून ‘महाविकास आघाडी’ची स्थापना केली होती. हे तिन्ही पक्ष सत्तेत होते, तोपर्यंत त्यांच्यात एकवाक्यता होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना कमकुवत झाली आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेने अंबादास दानवे यांच्या नावाचा अर्ज काल विधिमंडळात सादर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने हा अर्ज काल सादर केला आहे. परंतु या पदावर आता काँग्रेसनेही दावा केला आहे. एखादे तरी पद काँग्रेसला द्या, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे (Shivsena Vs Congress). विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. आमचा हट्ट नाही. परंतु त्यावर विचार तरी व्हायला हवा, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Cabinet Expansion : सुप्रिया सुळे म्हणाल्या, संजय राठोडांना मंत्रीपद मिळाल्याचा मनापासून आनंद

Eknath Shinde cabinet Expansion : मंत्रिमंडळातून नितेश राणेंचा पत्ता कट, पण दीपक केसरकरांना संधी

Eknath Shinde cabinet Expansion : वादग्रस्त अब्दुल सत्तार, संजय राठोड यांनाही मिळाली मंत्रीपदाची खूर्ची

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येवून ‘महाविकास आघाडी’ची स्थापना केली होती. हे तिन्ही पक्ष सत्तेत होते, तोपर्यंत त्यांच्यात एकवाक्यता होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना कमकुवत झाली आहे. एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

शिवसेनेला मजबुती मिळावी म्हणून विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेतेपदावर अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ प्रशासनाला पत्र लिहिले आहे. परंतु काँग्रेसने आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाविषयी आपलीही सुप्त इच्छा बोलून दाखविली आहे. त्यामुळे याबाबत ‘महाविकास आघाडी’चे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, हे औत्सुकत्याचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी