27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराजकीयशिवसेनेला धक्का! मोदी सरकारकडून आदित्य ठाकरेंवर कारवाई?

शिवसेनेला धक्का! मोदी सरकारकडून आदित्य ठाकरेंवर कारवाई?

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेतील प्रमुख नेतेमंडळींचा मोठा हिस्साच आपल्याकडे वळवल्यानंतर आता भाजपने शिवसेनेतील उरलेल्या प्रमुख नेत्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे, त्यामुळे त्यांच्या मागे आता ईडीची पीडी सुरू झाली आहे, त्यामुळे ती लवकर सुटेलच अशी खात्री नाही, तर दुसरीकडे माजी पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर मोदी सरकारकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या केलेल्या कामकाजाचे संपुर्ण ऑडिट मोदी सरकारकडून आता करण्यात येणार आहे.

दरम्यान मोदी सरकारचा हा निर्णय शिवसेनेसाठी आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. आतापर्यंत पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांनी घेतलेले निर्णय, निधी आणि राबवलेले विविध उपक्रम हे नेहमीच कौतुकाचे विषय ठरले आहेत. परंतु अचानकपणे त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे आणि कामकाजाचे ऑडिट होणार म्हणजे नेमकं सरकार काय करणार, त्यातून कोणता निष्कर्ष काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

केंद्र सरकारकडून विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराचे ऑडिट करण्यात येणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी वर्गांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मंडळाच्या कारभाराबद्दल काही टिकाटिप्पणी असेल तर ठिक नाहीतर मंडळाची उगाचच बदनामी झाली तर अशी चिंता सध्या मंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भेडसावत आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडिटचे काम सुरू केले असून मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड सह आदी विभागांतील कार्यालयांत हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई मुख्यालयाबरोबर नागपूरचा सुद्धा समावेश आहे, यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभागीय कार्यालयांमध्ये केंद्रीय यंत्रणांचा मोर्चा वळवला जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरू केली आहे. बंडखोरांच्या गावांमध्ये जात मोठे शक्तीप्रदर्शन करीत आहेत. शिवसैनिकांना भेट देत आहेत, तर शिवसेना कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करत आहेत. सध्याचा आदित्य ठाकरे यांचा हा झंझावती दौरा राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ठाकरे यांच्याविरोधात उचललेले कारवाईचे शस्त्र कशासाठी हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

‘राजा वही बनेगा जो हकदार होगा’, संदीप देशपांडे यांच्याकडून सूचक ट्वीट

नवनिर्वाचित राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ

ISC बारावी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर, उपासना नंदी देशात पहिली

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!