27 C
Mumbai
Wednesday, November 15, 2023
घरराजकीयश्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंचे पितळ पाडले उघडे !

श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंचे पितळ पाडले उघडे !

गेल्या वर्षभरात राज्यातील राजकारण हे वेगळ्या वळणावर गेलेलं पहायला मिळत आहे. कुणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. तर कुणी भाजपसोबत जाऊन हात मिळवणी करून सत्ता स्थापन करत आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यावेळी या घटनेला वर्ष होऊन गेले तरीही मात्र शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक चकमक काही थांबायच नाव घेत नाही. याबाबत आता मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता ठाकरे गटावर हल्ला चढवला आहे. त्यांनी स्वत: घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंची पोल खोलली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फेस टू फेस भेटा असे ओपन चॅलेंज दिले होते. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर भ्रष्टाचाराचा आरोप करत हे सरकार 100 टक्के भ्रष्टाचारी आहे. असा आरोप वरळी मतदार संघाचे माजी आमदार आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केलं आहे. यालाच प्रत्युत्तर म्हणून खासदार श्रीकांत शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा 

विधान परिषद गाठणार शंभरी! आजी माजी सदस्यांसाठी होणार खास कार्यक्रम

मनसे गुजरात्यांच्या गालावर वळ उठवणार !

दीपक केसरकर यांनी थाटले मुंबई महापालिकेत कार्यालय !

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?  

आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर श्रीकांत शिंदेणी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंचे कान टोचले आहेत. श्रीकांत शिंदे म्हणाले की, “जेलचं कसलं सांगताय. मुख्यमंत्र्यांनी लाठ्या खाल्या आहेत. कंपनी सुरू होण्याआधी हे सारे टेंडर दिले. हे सारे काळे कागद कोणाचे आहेत? यामुळे येत्या काळात कोणाला जेलमध्ये जावे लागेल” असा प्रतिसवाल श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी पक्षासाठी लाठ्या खाल्या 

“मुख्यमंत्र्यांनी पक्षासाठी लाठ्या खाल्या आहेत. तुम्ही काय केलं? तुम्ही जिथं सभेला जायचा तेव्हा फूड ट्रक तुमच्यासोबत असायचा. सॅन्डविच लागलं की आम्ही आणायला जायचो. यांना कोल्ड कॉफी लागायची आम्ही तीही आणायला जायचो. कधी आम्ही नांदेडला असलो तर एखाद्याला आपण सांभाजीनगरला पाठवायचा, तर दुसऱ्याला हैदराबादला पाठवायचा.” अशी बोचरी टीका श्रीकांत शिंदेंनी केली आहे.

श्रीकांत शिंदे एवढयावर न थांबत ते म्हणाले की, “तुम्हाला डीबेट करायची आहे ना, करूया यांचा कमावण्याचा सोर्स किती आणि आपला कमावण्याचा सोर्स किती आहे. हे लोकांसमोर मांडूया. हे लोकांना कळू दे. बीएमसी घोटाळा, कोरोना काळातील घोटाळा हे आता लोकांसमोर येत आहे. म्हणून जेलमध्ये जाण्याच्या चिंतेने दिल्लीला नरेंद्र मोदींचे पाय धरायला गेले होते.” हे पितळ श्रीकांत शिंदेंनी उघडे पाडले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी