32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयसामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे हाती बांधणार शिवबंधन

सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे हाती बांधणार शिवबंधन

टीम लय भारी

मुंबई : सामाजिक आणि फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्या आज (दि. २८ जुलै २०२२) गुरुवारी दुपारी शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. आणि त्यांच्या हातात शिवबंधन बांधणार आहेत (Social activist Sushma Andhare will tie Shivbandhan).  सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे शिवसेनेची कमी होत चाललेली ताकद वाढण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या राहिल्या आहेत.

सुषमा अंधारे यांनी चार ते पाच दिवस आधी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर रश्मी ठाकरे यांच्यासोबतच फोटो शेअर करत त्यांनी ट्विट देखील केले होते. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला पुन्हा नव्याने बळ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुषमा अंधारे या कायमच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत.

आजपर्यंत सुषमा अंधारे यांनी फुले-शाहू-आंबडेकर यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्या कायमच बजरंग दल आणि आरएसएसच्या विचारसरणीवर टीका करताना आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांना फैलावर घेताना दिसून आल्या आहेत. तर बहुतेक वेळा त्यांनी थेट शिवसेनेवर देखील हल्लाबोल केलेला आहे. तर जाहीर सभांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा बाप सुद्धा काढला आहे. पण आता त्या स्वतः शिवसेनेत प्रवेश करत असल्याने शिवसेना पक्षाला बेधकधकपणे वक्तृत्व करणारी व्यक्ती मिळाली आहे.

सुषमा अंधारे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्या त्यांच्या सर्व समर्थक आणि कार्यकर्त्यांसह यावेळी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. सुषमा अंधारे यांच्यामुळे भविष्यात शिवसेना पक्ष नव्याने उभारी करून येईल, अशी आशा सर्वसामान्य शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

अजित पवारांची थेट शेतकऱ्यांसोबत बांधावर चर्चा

प्रवाशांची पंचाईत! टॅक्सी, ऑटो चालकांचा 1 ऑगस्टपासून बेमुदत संप

पुढील दोन दिवसांत मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी