27 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयशिवसेनेच्या काही बंडखोरांसाठी उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख

शिवसेनेच्या काही बंडखोरांसाठी उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख

टीम लय भारी

मुंबई : आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना दोघांनी सुद्धा त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करण्याऐवजी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या काही बंडखोर आमदार आणि खासदार यांनी मात्र त्यांचा पक्षप्रमुख असाच उल्लेख शुभेच्छा देताना केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संपूर्ण शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अप्रत्यक्षपणे का असेना पण भविष्यात एकनाथ शिंदे हेच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ओळखले जातील, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख हे पद सुद्धा धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांची शिवसेना खरी असल्याचे सांगितले जात असतानाच, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे उद्या स्वतःला नरेंद्र मोदी म्हणू लागतील, असा टोलाही लगावला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा माजी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यानंतर त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

परंतु याउलट एकनाथ शिंदे गटात गेलेले माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने यांनी मात्र उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे. तर काहींनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेच टाळले आहे.

ज्यामुळे एकनाथ शिंदे गटात असलेल्या काही शिवसेना बंडखोरांसाठी (Shiv Sena rebels) उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, या गोष्टीमुळे या बंडखोरांच्या गोटातच त्यांचे शिवसेना पक्षप्रमख कोण? यावरून वाद तर होत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा :

मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, संदेशात ‘पक्षप्रमुख’ म्हणणे टाळले

‘उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील’, ठाकरेंची शिंदेंच्या महत्त्वकांक्षी लालसेवर टीका

११ वीची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी