29 C
Mumbai
Friday, August 11, 2023
घरराजकीयमाजी मंत्री नवाब मलिक यांना 'सर्वोच्च जामीन' मंजूर,थोरले पवार की, धाकटे पवार...

माजी मंत्री नवाब मलिक यांना ‘सर्वोच्च जामीन’ मंजूर,थोरले पवार की, धाकटे पवार यांची साथ देणार?

भाजपा विरोधात कायम पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणास्तव मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली  मलिक यांना अटक केली होती. मात्र गेल्या वर्षभरापासून मलिक कोर्टाच्या परवानगीनं कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात घेत आहेत. मलिकांनी बऱ्याचदा जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीमधील अंतर्गत पडझडीनंतर मलिक  थोरले पवार की, धाकटे पवार  यापैकी कोणाची साथ देणार हे पाहणे आता औत्सुक्याचे झाले आहे.

नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन मिळाला आहे. दोन महिन्यांसाठी नवाब मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मेडिकल ग्राउंडवर नवाब मलिकांना जामीन देण्यात आल्यामुळे ईडीकडूनही विरोध करण्यात आलेला नाही. नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. या आजारावर उपचारासाठी जामीन मिळण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा हा अर्ज मंजूर करत वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.
 हे सुद्धा वाचा
राजद्रोहाचा कायदा रद्द होणार; केंद्राने इंग्रजांच्या काळातले कायदे रद्द केले
वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्स पार्क प्रकल्प गेले, ‘हुंडाई’ राज्यात पाय रोवणार; 5000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
सुधीर भाऊ, तुम्ही सुद्धा? … आठ वर्षे झालीत: लॉटरी माफियांसमोर सरकार हतबल

हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी