30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीयसुप्रिया सुळेंचे आरक्षणासाठी सरकारला गाऱ्हाणे

सुप्रिया सुळेंचे आरक्षणासाठी सरकारला गाऱ्हाणे

राज्यात अनेक वर्षांपासून मराठा, धनगर आरक्षणावरून वाद सुरू आहे. समाजबांधव सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत. मात्र कोणते ना कोणते सरकार सत्तेत येते आणि आरक्षणाचा प्रश्न जसाच्या तसाच राहतो. यामुळे आता मराठा-धनगर बांधव संतप्त झाले आहेत. काही मराठा आणि धनगर बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सरकार यावर ठोस पाऊल उचलत नाही. काही दिवसांपासून अंतरवाली सराटी (Antarvali sarati) येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-patil) समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपोषण करत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायमुर्तींना उपोषणस्थळी पाठवून उपोषण मागे घेण्यास सांगितले. सरकारच्या अशा वागण्याने आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होऊ लागला आहे.

काही गावात काही तालुक्यातील काही स्थानिक नेते मंडळी उपोषणाला बसले आहेत. याचप्रमाणे बारामती येथे देखील धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) स्थानिक नेते मंडळी उपोषणासाठी बसले आहेत. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी (supriya sule) बारामती येथे जाऊन आंदोलक आणि उपोषण कर्त्यांची भेट घेतली आहे. आरक्षणाचा तिढा अनेक वर्षांपासून सुटता सुटेना.  यामुळे मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाज पेचात आहे. यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी आंदोलक मागणी करत आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंनी सरकारला धारेवर धरले आहे. सत्तेत आलो की भाजपने तातडीने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात आरक्षणाचे विषय भाजपाने जास्तीत जास्त रेंगाळत ठेवले आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत.


हे ही वाचा

नवरा-बायकोच्या अतुट नात्याचा सण दिवाळी पाडवा

‘वकील शरद पवारांना म्हणतात सॉरी’

पाकिस्तान संघ वर्ल्डकपमधून बाहेर जाताच भूकंप

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधव आंदोलन करीत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या सर्वांना भाजपाने सत्तेत येण्यासाठी तातडीने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात आरक्षणाचे हे विषय भाजपाने जास्तीत जास्त रेंगाळत ठेवले आहेत. केंद्रात आणि राज्यात बहुमतातील सत्ता असूनसुद्धा केवळ उदासीन दृष्टीकोन आणि दिलेले वचन न पाळण्याची मानसिकता यामुळे या समाजघटकांचे आरक्षणाचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. परिणामी त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यानंतर त्यांनी तरूणांच्या आत्महात्येवर भाष्य केले आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणांच्या आत्महत्या

आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणांच्या आत्महत्या होत आहेत.‌ ही मोठी उद्वेगजनक परिस्थिती आहे. यामुळे राज्य प्रचंड अस्वस्थ झाले आहे. हे लक्षात घेता, माझी या सरकारला विनंती आहे की आपण आरक्षण देण्याच्या दृष्टीने जी काही आश्वासने या समाजघटकांना दिली, त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी. असे गाऱ्हाणे सुप्रिया सुळेंनी सरकारला  घातले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी