30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीय'वकील शरद पवारांना म्हणतात सॉरी'

‘वकील शरद पवारांना म्हणतात सॉरी’

राज्यात सत्ता संघर्षावरून एकच चर्चा सुरू असून राजकीय पक्षातच नाही तर आता नात्यातही राजकीय नेत्यांची आपापसात जुंपली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार गटाच्या वकिलांवर संताप व्यक्त केला होता. मात्र आता सुप्रिया सुळेंनी बारामतीच्या सभेत दोन्ही वकील माझे मित्र असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपासून अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार गटात दोन फूट पडल्याने राष्ट्रवादी पक्षाचे होत्याचे नव्हते झाले आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही सुप्रिया सुळे आपल्या वडिलांना म्हणजेच शरद पवारांना (Sharad Pawar) एकटे न सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गेले काही महिन्यांपासून राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावरून कोर्टात सुनावणी सुरू आहे. शरद पवारांचे वय हे ८० वर्षे आहे. यामुळे साहेबांसोबत मी कोर्टात असणार आहे. मी माझ्या घरच्यांना, मुलांना ११ महिने येणार नसल्याचे सांगितले आहे. यामुळे आता मला टीव्हीवर पाहा, आजपर्यंत कोर्टाची पायरी चढले नव्हते. मात्र आता कोर्टाची सवय लागली आहे. एकदा कोर्टाची चढलेली पायरी उतरायची कशाला? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी कामात असल्याने मतदारांनो मला समजून घ्या, मतदार संघातून मी गायब झाली नाही, अशी मिश्कील टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.

हे ही वाचा

पाकिस्तान संघ वर्ल्डकपमधून बाहेर जाताच भूकंप

प्राजक्ता माळी ‘करोडपती’मध्ये ‘बिग बीं’ना काय म्हणाली?

किर्तिकर-कदम यांच्यात ‘गद्दार’वरून जुंपली

‘हम जितेंगे ये बाद मे देखेंने मगर लढेंगे जरुर’, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अजित पवारांची पुण्यात प्रतापरावांच्या घरी भेट झाली. या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र आमचे कौटुंबिक मतभेद नाहीत. राजकारण एका बाजूला आणि नाते एका बाजूला असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. याचप्रमाणे दोन्ही गटाचे वकील हे माझे मित्र आहेत, एकासोबत मी चहा घेते तर दुसऱ्या वकिलांसोबत जेवण करते. लोकं म्हणतात की काय चाललंय पण आपली दोस्ती एका बाजूला आणि आपली लढाई एका बाजूला कधी वकील शरद पवारांना भेटल्यावर सॉरी म्हणतात, असे वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी