राज्यात काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या सभेची चर्चा सुरू होती. तो दिवस येताच आज राज्यात मुंबईतील शिवाजीपार्क मैदानावर उद्धव ठाकरेंच्या सभेची सुरुवात झाली. तर दुसऱ्या बाजूला आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा सुरू आहे. केवळ मुंबई नाही तर इतर काही भागातून शिवसैनिकांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. या दोन्ही सभेसाठी जय्यत तयारी केली असून दोन्ही गटांच्या नेत्यांकडून आरोपप्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी शिवाजीपार्कवर विरोधकांवर टीकेचे बाण सोडले आहेत. त्यांनी ड्रग्ज प्रकरणावर देखील भाष्य केले.
काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा अंधारेंवर आता सर्वांची तोंडे बंद करू असे वक्तव्य केले. यावर सुषमा अंधारेंनी याआधी देखील देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले आहेत. सभेत आल्यानंतर सुषमा अंधारेंनी धमकी द्यायची नाही असा वक्तव्य केले आहे. त्यांनी राज्यात सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना अंमली पदार्थांच्या प्रकरणावरून महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ देऊ नका. आपण श्रीमंतांशी लढला असाल, व्यवसायीकाशी लढला असाल, मात्र आपण कधी गरीब महिलेशी लढला नाहीत. अशी तशी महिला नाही, चळवळीतून आलेली महिला आहे, धमक्याचे काम नाही असे वक्तव्य आता सुषमा अंधारेंनी केले आहे.
हे ही वाचा
फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला, असे का म्हणाल्या सुषमा अंधारे…
गोपीचंद पडळकरांच्या सांगली जिल्ह्यात धनगर आरक्षणावरून युवकाची आत्महत्या
रवींद्र चव्हाण यांच्यानंतर डोंबिवली विधानसभेसाठी कोणाचे नाव चर्चेत?
त्यानंतर त्यांनी नाव घेत पुन्हा फडणवीसांवर टीका करत आपण चाणक्य आहात का? असा सवाल केला आहे. त्याचप्रमाणे चाणक्य हे केवळ घडवतात, आपण कोणाला घडवत आहात? आपण संपवत आहात, देवेंद्र फडणवीस हे स्वतःला चाणक्य म्हणवत आहेत. मला ही अतिशययोक्ति वाटते असे वक्तव्य करत सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. काही लोकं मांडवली करत आहेत. असा खळबळजनक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
त्यानंतर भाजप नेते मोहित कुंभोज यांनी सुषमा अंधारेंविषयी ट्वीट केले होते की, इनका भी मोईन मोईत्रा जल्द होगा! यावर अंधारेंनी फडणवीसांवर टीका करत एक नेता महिला नेत्याबद्दल काय बोलतो. ही केवळ फडणवीस तुमच्यामुळे होत आहे. पण मी घाबरणार नाही, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाषण करत निरोप घेतला.