33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयसुषमा अंधारेंचा राजीनामा, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निर्णय

सुषमा अंधारेंचा राजीनामा, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निर्णय

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ अंधारे यांनी हा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ अंधारे यांनी हा निर्णय घेतला आहे. अंधारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्या अखत्यारित ही समिती काम करते. अंधारे यांनी सोशल मीडियावर पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अंधारे यांनी लिहिले आहे, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले , कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्व मंडळी आमच्या जगण्याचे आदर्श आहेत. पण गेली काही महिने सातत्याने या महापुरुषांचा अपमान करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून घडवून आणले जात आहे. महामहीम राज्यपाल पदावरील व्यक्तीपासून ते मंत्री, सभागृहातील सदस्यांपर्यंत रोज कुणीतरी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवणे याची जणू स्पर्धाच लागली आहे.समितीतील इतर सदस्यांनी काय निर्णय घ्यावा हा प्रश्न आहे. मात्र माझ्यासाठी अशा परिस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाची जबाबदारी जी साधारण वर्षभरापूर्वी मी स्वीकारली होती. व सत्तांतरानंतरही निव्वळ बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी म्हणून ही जबाबदारी घेतलेली होती. परंतु ही समिती उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाच्याच अखत्यारीत येते आणि जर याच खात्याचे मंत्री यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके हिन दर्जाचे विचार असतील तर समितीतील सदस्य पदापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आमच्यासाठी लाख पटीने महत्त्वाचा आहे. सबब आपण केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मी या समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.
_ सुषमा दगडूराव अंधारे – अशी पोस्ट अंधारे यांनी सोशल मीडियावर केली आहे.

हे सुध्दा वाचा

वाढदिवशी किस करुन सेल्फी घेतला, व्हायरल करण्याची धमकी देऊन केले वारंवार अत्याचार

पुण्यात चंद्रकांत पाटलांचे तोंड काळे; महापुरुषांच्या अवमानाविरोधात कार्यकर्त्यांनी केली शाईफेक !

‘टाटा’ आता सेमीकंडक्टर प्रॉडक्शन करणार; येत्या पाच वर्षांत करणार 7.4 लाख कोटींची गुंतवणूक

चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यभरात त्यांच्याविषयी नाराजी आहे. शनिवारी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर शाईफेक झाल्यानंतर पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शाईफेक करणे हा भ्याडपणा असून हिंमत असेल तर समोर या असे आव्हान पाटील यांनी दिले आहे. गिरणी कामगाराचा मुलगा मोठा झालेला सरंजामशाही मानसिकतेच्या व्यक्तींना सहन होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी