30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयजयंत पाटील यांचे निलंबन; विरोधी पक्षांचा सभात्याग

जयंत पाटील यांचे निलंबन; विरोधी पक्षांचा सभात्याग

नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात बोलू न दिल्याने संतापलेले राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Suspension) यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल असंसदीय शब्द वापरल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचे निलंबन (Suspension) करण्याचा ठराव मांडला होता. त्यानंतर आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.

सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू दिले जात नसल्यामुळे आज जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला, यावेळी विधानसभा अध्यक्षांना त्यांनी ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका’ असे म्हटले त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या संदस्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा ठराव तसेच वक्तव्याबाबत चौकशी समिती स्थापन करण्याचा विधानसभेत मांडला. सभागृहात हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येऊन जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशनापुरते निलंबन करण्यात आले. दरम्यान विरोधीपक्ष नेते यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली, यावेळी विरोधीपक्ष देखील आक्रमक झालेले चित्र सभागृहात पहायला मिळाले. जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे विरोधीपक्षांनी सभात्याग केला.

हे सुद्धा वाचा
मुलांच्या शिक्षणाची काय व्यवस्था आहे? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादी वरचढ

मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करा; अंबादास दानवे यांची मागणी

सभागृहात आज शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी द्यावी म्हणून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मागणी केली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी त्यांची मागणी फेटाळल्याने विरोधी पक्षाचे सदस्य जयंत पाटील आक्रमक झाले. यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका’, असे विधानसभा अध्यक्षांना म्हटले. त्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ उडाल्याने सभागृहाचे कामकाज १० मिनीटे तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर सभागृह सुरू झाल्यानंतर जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी