25 C
Mumbai
Thursday, September 7, 2023
घरराजकीयजीआर घेऊन अर्जुन खोतकर यांनी घेतली जरांगेंची भेट, मात्र आंदोलन कायम

जीआर घेऊन अर्जुन खोतकर यांनी घेतली जरांगेंची भेट, मात्र आंदोलन कायम

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेलं आंदोलन दिवसेंदिवस सरकारला त्रासदायक ठरत आहे. अखेर शिंदे सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. खासदार अर्जुन खोतकर आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना शासनाचा जीआर दाखवला आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान, जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आंदोलन हे सुरूच राहणार असून त्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे. अशी माहिती मिळत आहे.

निजामकालीन कुणबी असल्याच्या नोंदी असणाऱ्या मराठा समाजातील कुटुंबीयांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर मराठा आंदोलन मागे घेण्यात येईल असे सरकारला वाटत होते. पण मनोज जरांगे यांनी, ]आम्ही शांतपणे उपोषण करत आहे. त्यामुळे वंशावळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन, सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच आमच्याकडे पुरावे असल्याचं आम्ही आधीच सांगितले आहेत. त्यामुळे सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आदेश काढण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत, घेऊन जावेत,’ असे म्हटले. त्यामुळे सरकारची गोची झाली.

त्यामुळे गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी सरकारच्या वतीने पुन्हा एकदा अर्जुन खोतकर अंतरवाली सराटी गावात पोहचले. तसेच यावेळी जीआरची कॉपी खोतकर यांनी जरांगे यांना दाखवली. ज्यांच्याकडे निजामकालीन कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्याचाच जीआर घेऊन खोतकर आले आहेत. तसेच मनोज जरांगे आणि खोतकर यांच्यात चर्चा झाली.

अर्जुन खोतकर यांच्या भेटीआधी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘मराठा समाजातल्या ज्या लोकांकडे कुणबी असल्याची नोंद आहेत, त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पण सर्व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. तसेच सरसकट प्रमाणपत्र देण्यासाठी एक महिन्याची वेळ सरकारने मागितली आहे. आमच्याकडे कुणाकडेच कुणबी असल्याची नोंदी नाहीत. त्यामुळे कालच्या निर्णयाचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे यात सुधारणा केली पाहिजे.’
 हे सुद्धा वाचा
एकनाथ शिंदेंना जरांगे-पाटील यांना भेटायला वेळ नाही, पण ३० दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती
मला शाहरुखला भेटायचंही नव्हतं; गिरीजा ओक काय म्हणाली….
तुम्हाला माहिती आहे का, जन्माष्टमीनंतर दहिहंडी का साजरी केली जाते ?

मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही शांतपणे आंदोलन करत आहे. आमचे सहकारी आजही रुग्णालयात उपचार घेत आहे.तरीही आम्ही शांतपणे उपोषण करत आहे. त्यामुळे वंशवंळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन, सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच, आमच्याकडे पुरावे असल्याचं आम्ही आधीच सांगितले आहेत. त्यामुळे सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आदेश काढण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत, घेऊन जावेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. तसेच, मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत निजामकालीन पुरावे वाचून दाखवले आहेत. त्यात मराठा जाती समूहाची कुणबी म्हणून नोंद असल्याचा दावाही मनोज जरांगे यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी