29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयलक्ष्मण जगताप यांच्या आजारपणातच भाजपने रचले होते आमदारकीच्या निवडणुकीचे कारस्थान, राष्ट्रवादी नेत्याच्या...

लक्ष्मण जगताप यांच्या आजारपणातच भाजपने रचले होते आमदारकीच्या निवडणुकीचे कारस्थान, राष्ट्रवादी नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाची कामगिरी उचलणारे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण पाटील हे कर्करोगाशी रुग्णालयात झुंज देत असतानाच भाजप आमदारकीच्या निवडणुकीचे कारस्थान रचत होता, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे चिंचवडचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. यावरून भाजपच्या राजकीय संस्कृतीवर शेळके यांनी खोचक भाष्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये पोटनिवडणुकीआधीच कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. (The conspiracy of MLA elections was created by BJP during the illness of Laxman Jagtap)

लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारदरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने चिंचवड मतदारसंघातील जागा रिक्त झाल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मंगळवारी राष्ट्रवादीची पिंपळे गुरव या ठिकाणी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आमदार सुनील शेळके कार्यकर्त्यांना संबोधित केले.

ते म्हणाले, ‘दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत होते. भाजपने तीन महिन्यापासून चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची तयार सुरू केली. अशा ठिकाणी सहानुभूतीचा विचार करायचा का?.’ यावेळी त्यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. ते म्हणाले,’चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. या जागेवर महाविकास आघाडीतील पक्षांनी दावा केला असला तरी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नक्कीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा (High command would think about Rashtrvadi Cogress candidate) विचार करेल.’ यावेळी महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, वर्षा जगताप, माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, चिंचवड विधानसभेचे कार्याध्यक्ष शाम जगताप उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

Super Exclusive : जिना म्हणाले होते, लोकमान्य टिळकांनी हिंदू – मुस्लिम ऐक्य घडवून देशाची सेवा केली; दीपक केसरकरांनी वितरीत केलेल्या पुस्तकातून समोर आला इतिहास

माजी आमदार नारायण पाटील सुसाट, संजयमामा शिंदेंना केले सपाट!

बजेट २०२३ : ‘सेक्स’वर कर, तुमच्या आत्म्यावरही कर ; या आहेत जगातील जुलमी कर पद्धती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी