पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना अलीकडेच निलंबित करण्यात आले होते. तथापि, मी नियमबाह्य काम करत नाही म्हणून माझं निलंबन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला लिहिलेले पत्र व्हायरल झाले आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Wadettiwar) यांनी, भ्रष्टाचारी सरकारने पापाचा कळस गाठला असल्याची घणाघाती टीका केली आहे.(The corrupt government has reached the pinnacle of sin, Wadettiwar)
पुणे मनपा आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांना पत्र लिहून, निलंबन मागे घेण्यास सांगितले आहे. मंत्र्यांनी त्यांना बोलवून वारंवार नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकला, ते काम केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली. याबाबत त्यांनी अनेक खुलासे करून संबंधित मंत्र्यावर गंभीर आरोप केले असल्याचे वडेट्टीवार (Wadettiwar) यांनी म्हटले आहे.
आरोग्य खाते हे लोकांच्या आयुष्याशी निगडित आहे, अँब्युलन्स घोटाळ्यापासून अनेक विषयांवर आम्ही सरकारकडे जाब विचारला, पण सरकार तिथे कारवाई करत नाही. तथापि, प्रामाणिक अधिकारी या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणत आहेत. या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडरसाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तीस वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर स्वतःच्या न्यायासाठी पत्र लिहायची वेळ आली आहे. राज्यात भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला आहे, त्याची ही घटना साक्ष देणारी आहे, असे वडेट्टीवार (Wadettiwar) यांनी सुनावले आहे.