33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयनगरपरिषदेच्या नगराध्यक्षाची निवड आता थेट जनतेतून होणार, अधिसूचना जारी

नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाची निवड आता थेट जनतेतून होणार, अधिसूचना जारी

टीम लय भारी

मुंबई : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नगराध्यक्षाची थेट जनतेतूनच निवड होणार असल्याचे सांगण्यात आले असून याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील 92 नगरपरिषदा, 4 नगर पंचायत निवडणुकीतील उमेदवार थेट जनतेतून निवडून येणार आहेत. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे यंदाच्या निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे दिसणार आहे.

शिंदे – फडणवीस सरकारने सत्तेत येताच राज्यात वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण विषयांशी निगडीत निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. यावेळी राज्य सरकारने नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान येणाऱ्या निवडणुकांमध्ये थेट जनतेतूनच नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड होण्याबाबतचा अधिनियम जारी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाला सपशेल तिलांजली देत थेट निवडणुकीचा पर्यायच सरकारने समोर आला आहे.

नगरपरिषद, नगरपंचायतेत सदस्य विरोधी पक्षांचे आणि नगराध्यक्ष इतर पक्षांचा असे काहीसे चित्र असल्याने विकासकामांबाबत निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचा दावा करण्यात आला होता, त्यानंतर निवडणूक रद्द करण्यात आली होती, मात्र आता त्यानंतर राज्यात थेट नगराध्यक्ष आणि सरपंच निवडला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा…

संजय मंडलिकांच्या निर्णयावर सतेज पाटलांनी व्यक्त केली नाराजी

काय हाटील, काय झाडी म्हणत मजा मारुन राहिले… यांना मजा मारायला निवडून दिले का? जळगावात तुफान डायलाॅगबाजी

निष्ठा यात्रेनंतर शिवसेनेला भिवंडीत बसला धक्का

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी