33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयडाव उलटणार! 'या' राज्यातील भाजपचे 16 आमदार फुटण्याची शक्यता?

डाव उलटणार! ‘या’ राज्यातील भाजपचे 16 आमदार फुटण्याची शक्यता?

टीम लय भारी

रांजी : राज्यात एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यातील सत्तेती संपूर्ण समीकरणे बदलली. बंडखोरीच्या निर्णयाने शिवसेनेली उभी फूट पडली आणि शिवसेना वि. शिवसेना वाद सुरू झाला. या बंडखोरीने भाजपला पुन्हा येण्याचे बळ दिले आणि राज्यात नवे सरकार स्थापन झाले. फुटीचे राजकारण करून भाजप सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असला तरीही हीच पद्धत दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा अवलंबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान या प्रयत्नाला हाणून पाडत भाजपचेच 16 आमदार फुटण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ला घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता झारखंड राज्याकडे वळवला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेलाच डच्चू देत बंड केला त्याप्रमाणे झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस सुरू होईल असे एका भाजप नेत्याने सांगितले होते. दरम्यान, या वक्तव्याचा समाचार घेत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी त्यांच्या वक्तव्याने भाजपलाच धक्का दिला आहे.

भाजपचे झारखंडमधील 16 आमदार आमच्या संपर्कात असून ते हेमंत सोरेन सरकारला पाठिंबा देतील, असं वक्तव्यच भट्टाचार्य यांनी केले आहे, त्यामुळे भाजप गोटात एकच खळबळ उडाली आहे. या विधानाला स्पष्टीकरण देत भट्टाचार्य म्हणाले, राज्यातील भाजपचे 16 आमदार अस्वस्थ आहेत, त्यामुळं ते झारखंड मुक्ती मोर्चाला पाठिंबा देऊ शकतात किंवा भाजपचे 16 आमदार वेगळा गट स्थापन करुन सोरेन सरकारला पाठिंबा देऊ शकतात अशी शक्यता वर्तवून ऑपरेशन लोटसवरच टीका केली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पक्ष 16 आमदारांच्या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करत असल्याचे सुप्रियो भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. यावर भाजप प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी भट्टाचार्य  यांचा दावा फेटाळून लावत पक्ष टिकवण्यासाठी अशा खोट्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा…

रणजितसिंह डिसले गुरुजींना आणखी एक मानाचा पुरस्कार जाहीर

‘मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ राज्याला द्यायला हवा’, छगन भुजबळ यांची खंत

मुंबईकरांचे फोन चोरणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी