29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयChief Minister : दोन माजी मुख्यमंत्री भेटीने, राजकारणात संशय बळावला

Chief Minister : दोन माजी मुख्यमंत्री भेटीने, राजकारणात संशय बळावला

महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सुरु आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सगळे जण एकमेकांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी जात असतात. त्यात राजकीय नेते देखील एकमेकांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यात जातात. दोन माजी मुख्यमंत्री योगायोगाने गणपतीच्या दर्शनासाठी एकाच वेळी भेटले.त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सुरु आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सगळे जण एकमेकांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी जात असतात. त्यात राजकीय नेते देखील एकमेकांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यात जातात. दोन माजी मुख्यमंत्री (Chief Minister) योगायोगाने गणपतीच्या दर्शनासाठी एकाच वेळी भेटले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे अश‍िष कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले असता एकत्र भेटले. या विषयी अशोक चव्हाण यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देखील दिले आहे. ही भेट अनपेक्षीत होती. ठरवून घेतलेली नव्हती, आम्ही उभ्या उभ्या भेटलो. यावेळी कोणतीही राजकारणावरची चर्चा झाली नाही. उद्या दिल्लीमध्ये काँग्रेचा मोर्चा आहे. त्यामुळे मला दिल्लीला जायचे आहे असेही अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले आहे.

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar :अजित पवारांनी सांगितल्या लहाणपणीच्या करामती, लोकांमध्ये पिकला हशा!

Ganeshotsav 2022, : ‘कुठे राज ठाकरेंचे विचार आणि कुठे हा फडतूस कार्यकर्ता…’

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी थोपटले दंड, मोठे आंदोलन उभारण्याची तयारी

राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. हेच खरे आहे. विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये चांगली मैत्री असते. तरी देखील दोन विरोधी नेते एकत्र दिसले की चर्चा रंगतातच. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे नेते आहेत तर देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे. हे दोन विरोधी पक्ष नेते आमने सामने आले की, हाय हॉलो तर करणारच, परंतु तरीही अनेकांच्या मनात संशय निर्माण होतो. त्याला कारणही तसेच आहे.

Chief Minister : दोन माजी मुख्यमंत्री भेटीने, राजकारणात संशय बळावला

सद्याची परिस्थिती एकनाथ शिंदेनी बंड केले त्यानंतर शिवसेनेतील नेत मंडळींनी आमला मोर्चा शिंदे फडणवीस यांच्याकडे वळवला हे सर्व महाराष्ट्राने याची देही याची डोळा पाहिले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांवर कोणाचा भरवसा राहिलेला नाही. तसेच फोडाफोडीचे राजकारण करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात कोणीही धरु शकत नाही हे देखील सर्वांना माहित आहे. त्यामुळ अशा घटना घडल्या की मीड‍ियासह सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकतेच.

काल राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. त्या चर्चांना देखील उधाण आले आहे. अशोक चव्हाण हे तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. अलिकडच्या काळात काँग्रेस मागे पडत चालली आहे. भाजपची मुळावर घाव घालण्याची पद्ध सर्वश्रुत आहे. जो बलाढय आहे त्याच्याकडे सगळे जण आकर्षीत होतात. त्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी