देशात लोकसभा निवडणूक पार पडली असून ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, निकालाच्या आधी १ जून रोजी एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पुन्हा एकदा एनडीएचं सरकार सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. एनडीएने ३५० चा आकडा पार करेल असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. एक्झिट पोलनंतर राजकीय नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकीकडे भाजपा पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा करत आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडी सत्ता स्थापन करेल, असा दावा विरोधी पक्षातील नेते करत आहेत. यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत विविध घडामोडींवर भाष्य केलं.आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहेत. आम्ही काय गोट्या खेळत नाही. आमचं आयुष्य सुद्धा राजकारण, समाजकारणात गेलं आहे, असा अप्रत्यक्ष इशारा राऊतांनी (Sanjay Raut) काँग्रेसला दिला. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांनी राऊतांवर खोचक टीका केली. “संजय राऊत (Sanjay Raut) ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली”, असा टोला पटोले (nana patole) यांनी लगावला.(The school where Sanjay Raut studied…,nana patole)
सांगली लोकसभेच्या जागेसंदर्भात एक्झिट पोलमध्ये विशाल पाटील हे जिंकतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली. यावर बोलताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) यावर नंतर बोलणार आहे.
नाना पटोले (nana patole) काय म्हणाले?
“कोणीही गोट्या खेळायला येथे बसलेलं नाही. सगळेजण राजकारण करायला आलेले आहेत. तुम्ही शंभर टक्के राजकारण करत असताल, पण आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत आहोत. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत मी जास्त वक्तव्य करणार नाही”, असं पटोले (nana patole) यांनी म्हटलं.
संजय राऊतांना टोला
आजच्या रोखठोकमध्ये राऊत (Sanjay Raut) यांनी असं म्हटलं की, ७० वर्षात लोकशाहीचा कचरा केला, त्यांच्या या विधानावर तुमची प्रतिक्रिया काय? यावर नाना पटोल (nana patole) म्हणाले, “संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली होती. त्यांच्या गावात पिण्याचे पाणी, रुग्णालय काँग्रेसने निर्माण केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान टिकवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. मी संजय राऊत याच्याबाबत काय प्रतिक्रिया द्यावी? ते अतिविद्वान आहेत. कालच ते लंडनवरून आले आहेत. तिकडून अजून काय जास्त शिकून आले ते मला माहिती नाही. त्यांच्यावर तिकडच्या थंडीचा असर झाला आहे की देशातील उष्णतेचा असर झाला हे मला माहिती नाही”, अशा खोचक शब्दांत नाना पटोले (nana patole) यांनी संजय राऊतांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं.