27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराजकीयशिंदे गटाची ताकद वाढली

शिंदे गटाची ताकद वाढली

टीम लय भारी

नवी दिल्ली : शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष १० आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या १२ खासदारांनीदेखील शिंदे गटाला (Shinde Group) आपला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या १२ आमदारांनी गटनेता बदलण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या १२ खासदारांनी शिंदेंच्या भूमिकेला समर्थन दिल्याने त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांचा गटनेता तर खासदार भावना गवळी यांचा प्रतोद म्हणून उल्लेख केला. गेल्या अडीच वर्षांपूर्वी जो निर्णय घ्यायला हवा होता, तो गेल्या एका महिन्यात घेतला. आताचे शिवसेना-भाजप सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. जनतेच्या मनातील सरकार आहे. या सरकारच्या भूमिकेचे सर्वांनीच स्वागत केले आहे. असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

या सरकारने गेल्या काही दिवसात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यासंबंधीचा निर्णय असो, किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भातील निर्णय असो, हे सरकार सामान्य लोकांचे असल्याने लोकहिताचे निर्णय सरकारकडून घेण्यात येत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारने एकत्र काम केले तरच त्या राज्याचा उत्कर्ष होतो, विकास होतो, असे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाणाच्या चिन्हावर शिंदे गटाकडून लवकरच दावा करण्यात येऊ शकतो. त्यामुळे आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्राच्या निर्णयावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नेमका काय निर्णय घेतात? हे पाहावे लागणार आहे. परंतु सद्यःपरिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचेचं दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ‘रविकांत वरपे’ यांनी दिले ‘रामदास कदमां’ना सडेतोड उत्तर

‘शपथ पत्र’ लिहून सुद्धा शिवसैनिक पळाले शिंदे गटात

किरीट सोमय्यांना शिवसेनेतील माहिती पुरवणारा ‘खबरी’ कोण ?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!