29 C
Mumbai
Saturday, August 12, 2023
घरराजकीयपुण्यात आता डबल इंजिन लागलं आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मिश्कील...

पुण्यात आता डबल इंजिन लागलं आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मिश्कील टिप्पणी

पुण्यासाठी ४० हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पुण्यात आता डबल इंजिन लागलं आहे. एक दादा होते, आता दोन दादा झाले आहेत. त्यामुळे दोघांनी मनात आणलं, तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा विकास होणारच आहे. पुण्याला पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्त करणार आहे.’ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पण प्रसंगी काढले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. चांदणी चौकातील पुलासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी म्हणाले, ‘पुण्यासाठी ४० हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पुण्यात आता डबल इंजिन लागलं आहे. एक दादा होते, आता दोन दादा झाले आहेत. त्यामुळे दोघांनी मनात आणलं, तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा विकास होणारच आहे. पुण्याला पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्त करणार आहे.’
राजद्रोहाचा कायदा रद्द होणार; केंद्राने इंग्रजांच्या काळातले कायदे रद्द केले
वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्स पार्क प्रकल्प गेले, ‘हुंडाई’ राज्यात पाय रोवणार; 5000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
सुधीर भाऊ, तुम्ही सुद्धा? … आठ वर्षे झालीत: लॉटरी माफियांसमोर सरकार हतबल

पुण्यात काही ठिकाणी हवेतून चालणारी स्काय बस (डबल–डेकर रेल्वे) आणण्याचा प्रयत्न असणार आहे. हवेतून चालणाऱ्या स्काय बसमध्ये अडीचशे लोक बसतात. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी स्काय बसची मांडणी एकदा पाहावी आणि त्याचा अभ्यास करावा. कारण, पुण्यातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊ शकणार नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी