28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयभाजपच्या भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच्या विरोधात उभे राहण्याची हीच ती वेळ

भाजपच्या भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच्या विरोधात उभे राहण्याची हीच ती वेळ

भारतीय जनता पक्षाच्या एकाधिकारशाहीखाली लोकशाही मूल्ये चिरडली जात आहेत. भाजप देशाला हुकूमशाहीच्या मार्गावर लोटत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केला आहे. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचे भूत विरोधी पक्षातील उपद्रवमूल्य असणाऱ्या नेत्यांच्या मानगुटीवर बसवून त्यांना झुकवायचे, असे कपटी राजकीय डावपेच भाजप अंमलात आणत आहे.

२०१४ नंतर म्हणजेच नरेंद्र मोदींचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत विरोधी पक्षातील नेत्यांना हेरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. भाजपच्या या रणनीतीविरोधात आता देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी रणशिंग फुंकले आहेत. भाजपच्या या कार्यपद्धतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विरोधकांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. एके काळी भाजपचा सर्वात विश्वसार्ह साथीदार असलेल्या शिवसेनेने म्हणजेच आताच्या उद्धव ठाकरे गटाने भाजपच्या या पाताळयंत्री कारस्थानांविरोधात एल्गार पुकारला आहे. भाजपच्या भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच्या विरोधात उभे राहण्याची हीच वेळ असल्याचे आवाहन ‘सामना’मधून खासदार संजय राऊत यांनी केले आहे. (This is the time to stand against the BJP’s corruption washing machine)

देशातील वाटेवर कदभी नव्हे इतक्या गोंधळाचे आहे. कालपर्यंत स्वायत्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक सरकारी यंत्रणांचे भाजपने खासगीकरण करून टाकले आहे. हा धोका अल कायदा आणि तालिबानपेशा भयंकरआहे. निवडणूक आयोग तर सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर होऊन भाजपच्या दारात शेपटी हलवत बसला आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयास निवडणूक आयोगाच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावा लागला व मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी त्रिदसदस्यीय समिती नेमावी लागली. भाजपच्या मनमानीस दिलेली ही चपराक आहे, असे जळजळीत टीकास्त्र संजय राऊत यांनी ‘सामना’मधून भाजपवर सोडले आहे.

This is the time to stand against the BJP's corruption washing machine

‘ईडी’ सीबीआय’चा हत्यार म्हणून वापर करून राजकीय विरोधकांचा ‘काटा’ काढला जात आहे. त्या अन्यायाविरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचे कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी म्हंटले आहे. त्यासाठीच त्यांनी ‘इन्साफ का सिपाही’ हे आंदोलन सुरु केले असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. राहुल गांधी यांच्या फोनमध्ये ‘पेगासस स्पायवेअर’ सोडून त्यांचे फोन ऐकले जात होते. ही यंत्रणा इस्रायलमधून खरेदी केल्याचा गौप्य्स्फोट राहुल गांधी यांनी केंब्रिज येथे केली. त्यामुळे देशाची बदनामी झाल्याचा राग भाजपच्या ‘पोपटरावांनी’ आळवल, अशा उपरोधिक शब्दांत राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

‘कॅशकांड’ होऊनही “ईडी’, सीबीआय’ भूमिगत
कर्नाटकातील भाजप आमदार मडल विरुक्षप्पा यांच्या घरात आठ कोटी रुपये ‘रोख’ घबाड सापडले. हे इतकं मोठं ‘कॅशकांड’ होऊनही “ईडी’, सीबीआय’ भूमिगत आहे. आमदार मडल यांच्या चिरंजीवांना लाखो रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली, पण त्यावर भाजपवाले बोलायला तयार नाहीत.

हे सुद्धा वाचा

माझ्यावर काहीही आरोप कराल तर याद राखा, मानहानीचा दावा ठोकेन ! रामदास कदम यांचा ठाकरेंना इशारा

अंधभक्तांचे विश्वगुरू गप्प का ? संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना सवाल

भविष्यात काँग्रेसला सोडचिट्ठी देणार का? रवींद्र धंगेकर म्हणाले…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी