30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरराजकीयउद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठाकरेंची डोकेदुखी आणखी...

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठाकरेंची डोकेदुखी आणखी वाढणार?

उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठकारेंची (Uddhav Thackrey) डोकेदुखी आणखी वाढणार आहे. आज धुळे येथे विमानतळावर उदय सामंत प्रसार माध्यामांसमोर बोलत होते. त्यावेळी माध्यमांसमोर ते म्हणाले की, दसरा मेळाव्या संदर्भात आमची भूमीका असण्याचे कारण नाही. ज्यांनी दसरा मेळाव्याची (Dassera Melava) परवानगी मागितली त्यांना ती मिळेल. आम्ही शिवसेना (Shivsena) म्हणून काम करतो. आम्ही शिवसेनेला संपवत होते, त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला वाचवले.

उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठकारेंची (Uddhav Thackrey) डोकेदुखी आणखी वाढणार आहे. आज धुळे येथे विमानतळावर उदय सामंत प्रसार माध्यामांसमोर बोलत होते. त्यावेळी माध्यमांसमोर ते म्हणाले की, दसरा मेळाव्या संदर्भात आमची भूमीका असण्याचे कारण नाही. ज्यांनी दसरा मेळाव्याची (Dassera Melava) परवानगी मागितली त्यांना ती मिळेल. आम्ही शिवसेना (Shivsena) म्हणून काम करतो. आम्ही शिवसेनेला संपवत होते, त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला वाचवले. मी शिंदे गट म्हणून काम करत नाही. तर शिवसेना म्हणून काम करतो. मी महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात शिवसेनेचा मंत्री म्हणून काम करत आहे. शिवसेनमध्ये राहून एकनाथ शिंदेना (Eknath Shinde) समर्थन देत आहे. शिवसेनेला घटक पक्षांचे नेते संपवत होते. त्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेने संदर्भात विधीमंडळात आणि सुप्रिम कोर्टात काही प्रश्न प्रलंबित आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Jayant Patil : चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे – जयंत पाटील

जाणून घ्या ! कसे आहे आज सुरु होणाऱ्या ‘आशिया चषक 2022­­­­’ चे स्वरूप

Hemant Soren : झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची खुर्ची धोक्यात

यंदाचा शिवसेना दसरा मेळावा हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात होणार हा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी मागितली आहे. अद्याप पालिकेकडून याला परवानगी देण्यात आलेली नाही. शिंदे गट शिवसेना दसरा हायजॅक करते का? असा संशया यामुळे निर्माण झाला आहे. यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

अदित्य ठाकरे यांनी या बाबत आज प्रत‍िक्रीया दिल्या आहेत. ते म्हणाले की, ‘दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेनचाच राहणार, जनता देखील हे बघत आहे’. माध्यमांशी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही सतत प्रयत्न करतोय. पण तुम्हाला माहित आहे. जे गद्दार सरकार आले आहे. ते दडपशाहीचे सरकार आहे. मुंबई मनपामध्ये प्रशासन बदलेले नाही. शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. जनता देखील हे बघत आली आहे. गद्दार हे खोके सरकार पुढे नेत आहे. खोके सरकारच्या मागे कोण होते, ते आता पुढे यायला लागले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी