27 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरराजकीयउद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेंना आव्हान; होऊन जावूद्या आमनासामना!

उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेंना आव्हान; होऊन जावूद्या आमनासामना!

या महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, तुम्ही मोदींचे (Narendra Modi) माणूस असाल तर मोदींचा फोटो घेऊन लोकांमध्ये जा; आम्ही बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) फोटो घेवून लोकांमध्ये जाऊ, होवून जावूद्या आमनासामना, असे आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.२३) माटूंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. (Uddhav Thackeray challenge to Eknath Shinde; Let’s face each other!)

मुंबईतील विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात आम्ही मोदींची माणसं असल्याचे म्हटले होते. शिंदे यांच्या या विधानावर आज उद्धव ठाकरे यांनी कडाडून प्रहार केला.

बाळासाहेबांचा माणूस काल मोदींचा माणूस आता पवारांचा सल्ला घेतो असे मुख्यमंत्री म्हणाले, असे म्हणत मग आम्ही काय घेत होतो ? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना टोला लगावला. यांचे स्वत:चे आयडॉलच नाहीत, मोदी असले तरी बाळासाहेबांशिवाय तुम्ही कोणीच नाही, असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले.

जो डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही!

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. काही बर्षांपूर्वी रामदास आठवले आले होते पण ते भाजपच्या कळपात गेले. आज दोन विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोन नातू एकत्र आल्यानंतर जो डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही.

 हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे वंचितला मविआमध्ये सहभागी करुन घेण्यात यशस्वी होतील का?

आता चिंतन, मनन करायचे आहे म्हणत, राज्यपालांची पदमुक्त करण्याची पंतप्रधानांकडे इच्छा

बॉक्सिंग दिग्गज मेरी कोम करणार 5 सदस्यीय सरकारी पॅनेलचे नेतृत्व; ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची होणार चौकशी

ज्यांनी बाळासाहेबांचा हात सोडला तो कायमचा संपला : संजय राऊत

य़ावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील बंडखोरांवर जोरदार शरसंधान साधले. राऊत म्हणाले, शिवसेना घामातून उभा राहिलेला पक्ष आहे, तो कुणाला चोरता येणार नाही. हल्ली देवाच्या मुर्त्या लोक चोरतात. मात्र चारोलेली मुर्ती कोणी मंदिरात ठेवत नाही. चोरलेल्या मुर्तीचे कोणी मंदिर उभारत नाही. त्यामुळे ही मुर्ती चोरांची आवलाद आली तशी नष्ट होईल असा घणाघाती प्रहार राऊत यांनी शिंदे यांच्यावर करत ज्यांनी बाळासाहेबांचा हात सोडला तो कायमचा संपला असा इशारा देखील दिला.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी