32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्राच्या मातीचं तुम्हाला कधी वैभव दिसलं नाही का...? उद्धव ठाकरेंची तुफान शाब्दिक...

महाराष्ट्राच्या मातीचं तुम्हाला कधी वैभव दिसलं नाही का…? उद्धव ठाकरेंची तुफान शाब्दिक फटकेबाजी

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या काय झाडी… काय डोंगार, काय हाटील… या डायलाॅगने. महाराष्ट्राने हा डायलाॅग अक्षरशः डोक्यावर नाचवून शहाजीबापूंना रातोरात फेमस केले. दरम्यान शहाजीबापू पाटील यांना या डाॅगलावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणतीच भीडभाड न बाळगता धू धू धुतले आहे. “महाराष्ट्र देखील किती सुंदर आहे… ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्रातल्या निसर्गाची भुरळ पडत नाही…? त्यासाठी गुवाहाटीला जायची गरज काय होती?” असा खोचक सवाल ठाकरे यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रातील अभूतपुर्व सत्तांतरच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना बेधडक मुलाखत दिली. या मुलाखतीत महाविकास आघाडीचे अपयश, शिवसेना संपवण्याचे षडयंत्र ते शिवसेनेचे भविष्य अशा सगळ्यांच मुद्यांवर बिनधास्त बोलत राऊतांच्या सगळ्याच प्रश्नांना त्यांनी रोखठोक उत्तरे दिली. मुलाखतीत शिवसेनातील शिंदे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग, एकनाथ शिंदे यांच्यावर डोळेझाकून टाकलेला विश्वास, बंडानंतर शिवसेनेची भूमिका अशा सगळ्याच बाबतीत ठाकरे यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

दरम्यान, बंडामध्ये डायलाॅगबाजीने फेमस झालेले आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र देखील किती सुंदर आहे… ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्रातल्या निसर्गाची भुरळ पडत नाही…? आणि गुहावाटीतल्या निसर्गाची भुरळ पडते, म्हणजे मला कळतच नाही… तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत कसे काय जन्माला आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीचीच तुम्हाला ओढ नाही, प्रेम नाही, त्या मातीचं तुम्हाला कधी वैभव दिसलं नाही का…?” असे म्हणून शहाजीबापूंना ठाकरे यांनी चांगलीच चपराक लगावली आहे.

“मी स्वतः कलाकार आहे, माझी यावरुनही बरीच चेष्टा झाली.. मी स्वतः गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केलेली आहे.. पंढरपूरच्या वारीची फोटोग्राफी केलेली आहे… त्यावेळी मी जो महाराष्ट्र बघितला, पावसाळ्याच्या सुमारास मी ही सगळी फोटोग्राफी केलेली… एवढा नटलेला-थटलेला दऱ्या खोऱ्यांमधून पाणी वाहत असलेला… फुलांनी गच्च भरुन गेलेला.. महाराष्ट्राच्या निसर्ग सौंदर्याचं काय रुप वर्णावं.. आम्ही तर शहरी बाबू… तुम्ही ग्रामीण भागातले आमदार असूनही तुम्हाला महाराष्ट्राचे सौंदर्य दिसत नाही, त्याचं वर्णन करावसं कधी वाटलं नाही… मग डायरेक्ट गुवाहाटीला जाऊन निसर्ग सौंदर्याचं वर्णन…. मी गुवाहावटीला वाईट म्हणत नाही, कारण प्रत्येक प्रदेश चांगलाच असतो, पण अशी ही माणसं हे मातीसाठी काय करणार?” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी यावेळी तुफान शाब्दिक फटकेबाजी करीत शहाजीबापूंना सुनावले आहे.

हे सुद्धा वाचा…

डाव उलटणार! ‘या’ राज्यातील भाजपचे 16 आमदार फुटण्याची शक्यता?

रणजितसिंह डिसले गुरुजींना आणखी एक मानाचा पुरस्कार जाहीर

VIDEO : जाणून घ्या, नगरसेवकांच्या कामांचे खरेदी आदेश कसे मिळवाल ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी