26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeराजकीयशिंदे-फडणवीस सरकारलाच प्यारे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे

शिंदे-फडणवीस सरकारलाच प्यारे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार गतिमान सरकार असल्याच्या जाहिराती करीत असले तरी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला हे सरकार बदलल्याचा अद्यापही मागमूस नाही.ही बाब भीम आर्मी या सामाजिक संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनात आणून दिली आहे. या महामंडळाच्या वांद्रे स्थित कार्यालयाची अवस्था दयनीय असून या ठिकाणी देण्यात येत असलेल्या माहितीपत्रकात अजूनही मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार यांचीच छायाचित्रे असून हा भोंगळ कारभार थांबवून हे महामंडळ सक्षम करावे, अशी मागणी भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे.

राज्यातील अनुसूचित जाती ,नवबौध्द तरुणांना उद्योग धंद्यात सहकार्य करण्यासाठी राज्य सरकारने महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची सुरुवात केली आहे. चर्मकार, मातंग, ढोर आणि नवबौद्धांसाठी हे महामंडळ आहे. आपले सरकार गतिमान निर्णय घेणारे सरकार समजले जाते.परंतु या महामंडळा च्या वांद्रे येथील कार्यालयाची दयनीय अवस्था पाहता आपले सरकार मागासवर्गीयांविषयी किती गंभीर आहे,याची प्रचिती येत असल्याची तक्रार अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.

या महामंडळाने मागील आठवड्यात पन्नास टक्के अनुदान योजना आणि बीज भांडवल योजने अंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.मात्र,याची माहिती घेण्यासाठी वांद्रे कार्यालयात गेलो असताना मोडक्या अवस्थेतील धूळ खात असलेल्या खुर्च्या टेबल. एकंदरीत कार्यालयाची अवस्था मरणासन्न झालेली आढळली . महामंडळाचे माहितीपत्रक मागितले असता या माहितीपत्रकात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार व सामाजिक न्याय मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून अनुक्रमे धनंजय मुंडे आणि विश्वजित कदम यांचा फोटोसह उल्लेख असलेले माहितीपत्रक येथील कर्मचाऱ्यांनी हातात दिले. अधिक माहिती घेतली असता माहितीपत्रके छापण्यासाठी महामंडळाकडे निधीच उपलब्धता नसल्याचे सांगण्यात आलं,अस कांबळे यांनी सांगितले.

आपले सरकार गतिमान सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री आपल्या भाषणात वारंवार करीत असले तरी ,मुख्यमंत्री पदासह सामाजिक न्याय विभागदेखील मुख्यमंत्र्यांकडेच आहे. तरी मागील चार वर्षांपासून आपण या विभागामार्फ़त देण्यात येणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिलेले नाहीत. समाजात आपल्याविषयी तीव्र नाराजीची भावना असल्याच कांबळे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

वंचितचा मुंबईत एल्गार मेळावा

शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत? त्याने रक्ताच्या थेंबाने लिहिले राज्यपालांना पत्र..!

गँगस्टरच्या मुलाला सायबर गुन्हेगारांनी लुटलं

सोबतच ज्या महामंडळाने मागील आठवड्यात पन्नास टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्या महामंडळाच्या कार्यालयाची अवस्थाच अशी भयाण असेल, त्यांच्याकडे माहितीपत्रकांसाठीच जर निधी उपलब्ध नसेल तर ते महामंडळ लोकांना कर्ज काय देणार असा प्रश्न पडला असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी