29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कणखरपणामागे कार्यरत आहे पडद्यामागील ‘खास माणसां’ची फौज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कणखरपणामागे कार्यरत आहे पडद्यामागील ‘खास माणसां’ची फौज

टीम लय भारी

मुंबई : भाजपकडून होणारे सततचे वार, राज्यपालांच्या माध्यमातून सरकार अस्थीर करण्याचा प्रयत्न, तर अनपेक्षितपणे ‘कोरोना’ची आलेली आपत्ती… चोहो बाजूने अशी संकटे येत असतानाही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) शांतपणे, पण लिलया मुख्यमंत्रीपदाची यशस्वी जबाबदारी कशी काय सांभाळतात याचे महाराष्ट्रातील जनतेलाही नवल वाटते.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे स्वतः सक्षम आहेतच, पण कितीही संकट आले तरी सरकार डगमगणार नाही याची काळजी घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विश्वासार्ह लोकं जमा केली आहेत. एखाद्या गुप्तचर संघटनेप्रमाणे ही लोकं उद्धव ठाकरे यांच्यासाठी मनापासून काम करतात.

Mahavikas Aghadi

या टीमध्ये काही औपचारिक, तर काही अनौपचारिक पद्धतीने लोक जोडले गेलेले आहेत. याबाबतची इत्यंभूत माहितीच सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

राजकीय, संघटनात्मक, प्रशासकीय व कोरोनासारख्या आपत्तीबाबत अचूक पावले टाकण्यासाठी ठाकरे यांची ही छुपी ब्रिगेड मदत करत असते, किंवा स्वतः उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे सुद्धा बेमालुपणे या मंडळींकडून सहकार्य मिळवतात.

सरकारमधील घटक पक्षांच्या सोनिया गांधी व शरद पवार या सर्वोच्च नेत्यांसोबत ठाकरे यांनी सलोखा ठेवला आहेच. पण सरकारमधील अनेक मंत्र्यांना त्यांनी आपलेसे केले आहे. यात अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत यांचा समावेश आहे.

घटक पक्षांचे मंत्री असले तरी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी या निवडक मंत्र्यांना खास विश्वासात घेतले आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये उत्तम एकवाक्यता साधण्याची किमया ठाकरे यांनी केली आहे.

प्रशासकीय यंत्रणेत उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना विकास खारगे व आशिषकुमार सिंग यांची मोठी मदत होत असते. अजोय मेहता हे मुख्य सचिव आहेतच. पण सीताराम कुंटे, भूषण गगराणी, तुकाराम मुंडे व इक्बाल सिंग चहल या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ठाकरे यांचे ट्युनिंग चांगले जमले आहे.

सरकार चालविण्यासाठी आवश्यक असणारे घटक पक्षाचे नेते, मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ठाकरे यांनी अशा पद्धतीने सहकार्य मिळविले आहे. पण संघटनात्मक पातळीवरील सुद्धा त्यांची टीम खास आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे ( Uddhav Thackeray ) नेहमी असतातच. पण तेजस ठाकरे, वरूण सरदेसाई, सूरज चव्हाण, अमोल कीर्तीकर हे तरूण कार्यकर्तेही पडद्या आडून सतत कार्यरत असतात.

प्रसारमाध्यमांमध्ये ठाकरे यांच्याविषयीची चांगली प्रतिमा बनविण्याची जबाबदारी हर्षल प्रधान पार पाडतात. माध्यम व जनसंपर्क याविषयी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना अचूक सल्ले देण्याचे काम सुद्धा प्रधान करीत असतात. आणखी एक महत्वाची जबाबदारी हर्षल प्रधान सांभाळत आहेत. प्रशासकीय व संघटनात्मक काम करणाऱ्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि त्या उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या, त्यानंतर त्यासाठी संबंधितांशी संवाद साधायचा अशीही जबाबदारी प्रधान यांच्यावर आहे.

आमदार आणि खासदार यांच्यासोबत योग्य समन्वय साधणे, आमदार – खासदारांच्या अडीअडचणी असतील तर त्या सोडविणे किंवा उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचविणे यासाठी अरविंद सावंत व रवींद्र वायकर जबाबदारी सांभाळतात. राजकीय पेचप्रसंगाच्या विषयात संजय राऊत जबाबदारी सांभाळतात.

संजय राऊत, अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी व भावना गवळी या तिघांकडे दिल्लीच्या राजकारणाची धुरा सोपविण्यात आली आहे. शिवसेनेची तळागाळातील ताकद कायम ठेवणे, किंबहूना ती अधिक वाढवत नेण्यासाठी गजानन कीर्तीकर, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, विनायक राऊत, निलम गोऱ्हे काम बघतात.

शिवसेनेत महिलांच्या विषयांना नेहमी महत्व दिले जाते. त्यात स्वतः रश्मी ठाकरे लक्ष घालतात. रश्मीताईंच्या सोबतीला विशाखा राऊत, मीना कांबळी, मनीषा कायंदे, शिल्पा देशमुख, किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे अशी महिला ब्रिगेड कार्यरत आहे.

उद्धव ठाकरेंबरोबर ( Uddhav Thackeray ) सतत असणारे, पण शांतपणे काम करणारे सल्लागार मिलिंद नार्वेकर, पीए असलेले राजपूत व विनोद हे सुद्धा मोठी भूमिका बजावत असतात.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या टीममध्ये आदित्य, तेजस यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे, सुनील प्रभू, भास्कर जाधव, भरत गोगावले, किशोर कान्हेरे ही मंडळी आहेत. हेमराज शाह, त्यांचे चिरंजीव अरविंद शाह, रवींद्र मिर्लेकर, नेरूरकर, शशांक कामत, अरविंद नेरकर ही मंडळीही उद्धव ठाकरेंसाठी पक्षात महत्वाचे काम करीत असतात.

सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी जाणीवपूर्वक आपली खास माणसे तयार केली आहेत. ही सगळी माणसे उद्धव ठाकरे यांना प्रत्येक विषयात मदत करतात.

ठाकरे यांनी विकसित केलेल्या या टीममुळेच ते संकटकाळातही उत्तम प्रकारे सरकार चालवित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar …अन् अजितदादांनी ‘त्या’ फाईलवर एका मिनिटात, तर मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांत सही केली

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या आमदारकीने भाजपच्या मनसुब्यांवर पाणी

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून परतफेड, साधूंच्या हत्येबद्दल योगी आदित्यनाथांना केला फोन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी