21 C
Mumbai
Friday, January 20, 2023
घरराजकीयआता उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात काढला पेन ड्राईव्ह; काय आहे त्या फिल्ममध्ये?

आता उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात काढला पेन ड्राईव्ह; काय आहे त्या फिल्ममध्ये?

जो संयम महाराष्ट्र दाखवत आलेला आहे तो संयम कर्नाटक दाखवत नाहीये. जर मी चुकत नसेन तर सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेल्यानंतर सुद्धा कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला आणि बेळगावचे नामांतर केले. एवढेच नाही तर तिकडे मराठी भाषिकांवर भाषिक अत्याचार सुरू आहे. आज मी सभागृहात माझे जे काही मत मांडले ते मत मांडत असताना मी दोन गोष्टी सभापती महोदयांकडे दिलेल्या आहेत. एक पेनड्राईव्ह आणि एक पुस्तक मी सभापतींना दिले असल्याचे ते पत्रकारांना म्हणाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरुन (Maharashtra-Karnataka border dispute) आज विधिमंडळात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आवाज उठवला त्यांनंतर त्यांनी विधीमंडळाबाहेर पत्रकार परिषद घेतली.

उद्धव ठाकरे म्हणाले, त्या पेनड्राईव्ह मध्ये साधारण ७० च्या दशकात शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने एक फिल्म बनवली गेली. केस फॉर जस्टीस ही या फिल्म मध्ये १८ व्या शतकातील पुरावे आहेत की किंती मराठी भाषा तिथे वापरली जाते. हे सगळे पुरावे जर पाहिले तर मराठी शाळा मराठी नाटकांची थिअटर्स, मराठीमधून होणारा कारभार या सर्व गोष्टी त्या फिल्म मध्ये दाखवलेल्या आहेत. ही फिल्म दिल्यानंतर महाजन रिपोर्ट अनकव्हर्ड हे पुस्तक देखील मी दिलेले आहे. महाजन अहवाल जो आपण स्विकारलेला नाही त्या महाजन अहवालाची चिरफाड करणारे पुस्तक त्यावेळेचे पुस्तकाची झेरॉक्स कॉपी म दिलेली आहे. कर्नाटकातील महाराष्ट्र व्याप्त प्रदेश जोपर्यत हा वाद सुटत नाही तो पर्यंत केंद्रशाशीत झाला पाहिजे. जेणे करुन केंद्राची हुकुमत राहील आणि कर्नाटक ज्या पद्धतीने जो भाषिक अत्याचार होत आहे तो थांबविला जाईल.

पंतत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, आज की उद्या ठराव आणायचे म्हणत आहेत. पण आज पर्यंत किती ठराव झाले. आपण आज पर्यंत पाहिले असेल महाऱाष्ट्रात कानडी भाषिकांवर मराठी भाषिकांचा अन्याय झाला नाही. पण बेळगाव आणि निपाणी परिसरात मराठी भाषिकांवर कानडी भाषिकांचा अत्याचार झालेला आहे. विज बिले असतील आणखी काही असेल हे सर्व कानडी भाषेतून सुरू झालेले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, तुम्ही माहिती घ्या तिथे सगळे व्यवहार कानडी भाषेत होतात, तिथल्या मराठी भाषिकांना कानडी भाषा येतच नाही त्यामुळे तिथल्या मराठी भाषिकांना आंगठे उठवावे लागतात. त्यामुळे तिथल्या एकदोन पिढ्यांना आंगठे बहाद्दर म्हटले जाते, असे मी ऐकले आहे. त्याबाबत माहिती मिळाली तर इथल्या लोकांना ती अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. त्यामुळे नुसता निषेध करुन त्याला कर्नाटक सरकार काही किंमत देत नाही. ज्या आक्रमकपणे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आणि विधानसभेत त्यांनी ठराव करुन घेतला. मी असे ऐकले की एक इंच देखील जागा आम्ही महाराष्ट्रताला देणार नाही. आम्हाला कर्नाटकची एक इंच देखील जागा नको आहे. आमच्या हक्काची जागा आम्ही मागत आहोत. पण ज्या आक्रमकतेने ते ठराव मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन कर्नाटक सरकारला रोखले पाहिजे. ते पुढे जात आहेत आणि आम्ही निषेध करुन थांबणार असू तर या फुसक्या ठरावाला काही अर्थ राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले बॉम्ब बरेच आहेत. वाती काढलेल्या आहे. फक्त त्या पेटवायचा अवकाश आहे. पण मला असे वाटते पहिल्यांदा हा ठराव झाला पाहिजे. काही जण म्हणत आहेत तुम्ही कुठे लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत. ह्या गोष्टीला अर्थ नाही, तुम्ही लाठ्या काठ्या तुम्ही आमच्यात असताना खाल्ल्या होत्या. याचा अर्थ असा नाही आता तुम्ही गप्प बसा. म्हणुन मी म्हणतो जो पर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ताबडतोबपणे विवादास्पद भाग केंद्रशासीत झाला पाहजे अशी मागणी आहे.

हे सुद्धा वाचा
खासदार गिरीश बापट यांची शरद पवारांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

नेपाळच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होणार चीनधार्जिणे, माओवादी ‘प्रचंड’

आगामी निवडणुकीत सुपर गद्दार, निर्लज्ज पुरंदरच्या बापूला गाडायलाच हवे !

काल परवा भाजपचे एक नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले हे सरकार अनैतिक आहे. आता सरकारच अनैतिक म्हटल्यानंतर त्यांच्याकडून नैतिकतेची काय अपेक्षा ठेवायची. कृषी मंत्र्यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले. एका बाजूला शेतकरी उघड्यावर सोडलेला आहे. मुख्यमत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. मी मागे म्हणालो होतो. मुख्यमंत्री हिंदुत्व मानणारे आहेत. म्हणून ते वारंवार देवदर्शनाला जात असतात. त्यांना नवस करणे आणि नवस फेडणे यासाठी दिल्लीला जावे लागते. आजचा दिवस नीट गेला म्हणून नवस फेडतोय उद्याचा दिवस नीट जाऊद्या म्हणून नवस करतोय म्हणून त्याच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. याच्यात महाराष्ट्राचे भले कुठे आहे. आज ते दिल्लीला गेलेत. ठिक आहे कारण काहीही असेल एका मंत्री महोदयांनी त्याचे उत्तर दिले आहे. त्याचा आदर करतो. पण एवढ्या दिल्लीवाऱ्यांमध्ये सीमाप्रश्नाचा मुद्दा कुठे आणि महाराष्टाचा मुद्दा कुठे आला असा सवाल त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे कुठे पंचनामे झाले आहेत, कुठे मदत दिली आहे. याबद्दल कोण काय बोलत आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच मराराष्टाचे मुद्दे पटलावर मांडण्यासाठी आम्ही विषय काढले आहेत पण विरोधकांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. विदर्भ मराठवाड्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ते प्रश्न आम्ही नेहमीच उचलत आहोत. तसेच सुब्रमण्यम स्वामी यांच्याविधानाबाबत ठाकरे यांना प्रश्न केला असता, ते म्हणाले. स्वामी जे बोलले आहेत मला वाटते त्यांना घरचा आहेर मिळालेला आहे. स्वामी ही व्यक्ती खुप जुन्या काळापासून राजकारणाशी संबंधीत आहेत. त्यांचे मत सुद्धा त्यांच्या पक्षातल्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!