25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरराजकीयUddhav Thackeray : सावरकरांबद्दल आम्हाला आदर, राहूल गांधी याच्या विधानाशी सहमत नाही;...

Uddhav Thackeray : सावरकरांबद्दल आम्हाला आदर, राहूल गांधी याच्या विधानाशी सहमत नाही; उद्धव ठाकरे यांनी मांडली भूमिका

उद्धव ठाकरे यांनी राहूल गांधी यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकारांबाबत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही. तसेच आमच्या मनात सावरकरांबद्दल आदरच आहे, असे ते म्हणाले.

राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत एका सभेत बोलताना सावरकरांबाबत केलेल्या विधानामुळे सध्या भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. राहूल गांधी यांच्या विरोधात भाजपने आंदोलने देखील केली. दरम्यान आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहूल गांधी यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकारांबाबत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही. तसेच आमच्या मनात सावरकरांबद्दल आदरच आहे, असे ते म्हणाले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. राहूल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या विधानामुळे सध्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राहूल गांधी यांनी सावरकरांनी देशाच्या विरोधात इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केल्याचा आरोप केला होता. राहूल गांधी यांच्या या आरोपामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट आक्रमक झाला असून महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने देखील राहूल गांधी यांच्या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांचे आघाडी सरकार होते. तसेच नुकतेच आदित्य ठाकरे हे देखील राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत पदयात्रा करुन राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला समर्थन देऊन आले होते. त्यामुळे राहूल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज (17 नोव्हेंबर) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, मी अत्यंत स्पष्टपणे सांगतोय की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात प्रेम, नितांत आदर आणि श्रद्धा आहे. राहुल गांधी जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही पण ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि इतर क्रांतीवीरांनी आपल्या भारताला जे स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, त्या क्रांतीवीरांवरून आज देशात राजकारण होत आहे. त्यामुळे देशाची पुन्हा गुलामगिरीकडे वाटचाल होतेय असे वाटायला लागल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना ही काही वर्षांनी टिकेल की नाही अशी शंका सुद्धा मला यायला लागली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एकत्र आलंच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Bharat Jodo Yatra : सोने गहाण ठेऊन सिलेंडर घेतला, पण गॅस १२०० रुपये झाला; मेडशीच्या महिलांनी मांडल्या व्यथा

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत

Narayan Rane : अखेर राणेंनी स्वत:च ‘अधीश’ बंगल्यावर चालवला हातोडा

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेना ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे हे राहुल गांधी प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बद्दल विधाने करतील असा मोठा आरोप बावनकुळे यांनी केला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!