28 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराजकीयउद्धव ठाकरे अर्जून खोतकरांना म्हणाले, तुमची अडचण असेल तर तुम्ही जा

उद्धव ठाकरे अर्जून खोतकरांना म्हणाले, तुमची अडचण असेल तर तुम्ही जा

टीम लय भारी

जालना : माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चांना खोतकरांनी अखेर विराम देत एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याचे त्यांनी शनिवारी माध्यमांसमोर जाहीर केले, मात्र यावेळी त्यांनी त्यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देत मी परिस्थितीनुरूप निर्णय घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा निर्णय घेण्याआधी खोतकरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ठाकरे म्हणाले तुमची अडचण असेल तर तुम्ही जा असे म्हणून ठाकरे यांनी खोतकरांच्या निर्णयाला पाठींबा दर्शवला.

अर्जून खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याचे शनिवारी जाहीर केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, परिस्थितीनुरूप हा निर्णय घेत आहे असे म्हणून सुरक्षित राहण्यासाठी शिंदे गटात सामील होत  असल्याची प्रांजळ कबूली सुद्धा यावेळी खोतकरांनी दिली. हा निर्णय जाहीर करण्याआधी खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आणि शिंदे गटात जाण्याच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले, ज्याला ठाकरेंना तात्काळ मान्यता सुद्धा दिली.

माध्यमांशी बोलताना जालना सहकारी साखर कारखाना खरेदी संदर्भात सुरू असलेली ईडी चौकशीबाबत अप्रत्यक्ष माहिती देताना अर्जून खोतकर म्हणाले, निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून तापडिया यांनी 42 कोटी रुपयांस हा कारखाना विकत घेतला. परंतु दिलेल्या मुदतीत त्यांना पैसे भरता आले नाही. हा कारखाना पुढे अजित सीडस्यांनी 44 कोटी रुपयांस विकत घेतला. हा कारखाना सुरू राहावा यासाठी आपण आणि आपल्या परिवाराने त्यात सात कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यापैकी 5 कोटी रुपये देवगिरी बॅंकेकडून कर्जाच्या स्वरूपात घेतले आणि अद्यापही ते देणे आहेत. 2014 मध्ये हा कारखाना अजित सीडसेने ताब्यात घेतला. कर्मचारी न्यायालयात गेले. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. या पार्श्वभूमीवर हा कारखाना सुरू होण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली असे खोतकरांनी स्पष्ट करून ईडीच्या टांगत्या तलवारीबाबत भीती व्यक्त केली.

दरम्यान ईडीची पीडा टाळण्यासाठी अर्जुन खोतकरांनी हे पाऊल उचलले असेल का, सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या खोतकरांना शिंदे गटाकडून कोणती भीती दाखवण्यात येत असेल, उद्धव ठाकरे शिवसेनेची गळती कशी थांबवणार,शिंदे गट आणि भाजपचे असे दबावतंत्र कधीपर्यंत चालणार असे एक ना अनेक अनुत्तरीत प्रश्न अर्जुन खोतकरांच्या या निर्णयानंतर राजकीय पटलावर सध्या वादळी ठरू लागले आहेत.

हे सुद्धा वाचा…

राज्यपालांची बातमी दाबण्यासाठी आज ईडी कारवाईचा मुहुर्त, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे – संजय शिरसाठ

संजय राऊतांच्या ईडी कारवाईवर भाजप नेत्यांकडून यच्छेद तोंडसुख

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!