27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरराजकीयकाहीही झाले तरी भाजपसोबत युती कधीच होणार नाही: उद्धव ठाकरे

काहीही झाले तरी भाजपसोबत युती कधीच होणार नाही: उद्धव ठाकरे

मुंबईमध्ये महाविकासआघाडी (MVA) च्या महत्त्वाच्या नेत्यांची एकत्रितपणे बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या सभा घ्यायची रणनिती ठरवण्यात आली आहे. या सभांमधून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचं महाविकासआघाडीच्या नेत्यांनी ठरवलं आहे. त्याचप्रमाणे भाजपसोबत कधीही युती होणार नाही, असा दावा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मविआ कार्यकर्त्यांना एकजुटीने निवडणूक लढण्याचे आवाहन केले.

या सभेत भाषणादरम्यान, तुम्ही सगळे मिळून निवडणूक लढायला तयार आहात का? जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याची तयारी आहे का? आपण जर असे केले नाही तर देशात हुकूमशाही दिसेल, असे मत ठाकरे यांनी मांडले.

ठाकरे म्हणाले की, मविआ नेते नियमितपणे भेटतात परंतु कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरही समन्वय साधण्याची वेळ आली आहे. आम्ही (एमव्हीए सहयोगी) वर्षानुवर्षे एकमेकांविरुद्ध निवडणुका लढलो हे खरे आहे. पण समाधानकारक जागा न मिळाल्यास सर्व काही बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची वेळ आली आहे. काहीही झाले तरी भाजपसोबत युती कधीच होणार नाही, असेही ते म्हणाले.

काहीही झाले तरी भाजपसोबत युती कधीच होणार नाही: उद्धव ठाकरे
मुंबई येथे झालेल्या महाविकासआघाडीच्या सभेत डाव्याबाजूकडून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, (शिवसेना नेते) उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार.

तत्पूर्वी, सभेला संबोधित करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जनता महाराष्ट्राकडे आशेने पाहत आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. भाजपला हटवण्याची प्रक्रिया महाराष्ट्रातून सुरू होईल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथून पहिल्या राज्यव्यापी मोहिमेची सुरुवात करणार आहे. मविआचे तिन्ही पक्ष – शिवसेना (UBT), राष्ट्रवादी आणि काँग्रेस-सात संयुक्त रॅली काढणार असून त्यांना वरिष्ठ नेते संबोधित करतील. छत्रपती संभाजीनगरनंतर नागपूर (16 एप्रिल), मुंबई (1 मे), पुणे (14 मे), कोल्हापूर (28 मे), नाशिक (3 जून) आणि अमरावती (11 जून) येथे मोर्चे होणार आहेत.

महाविकासआघाडीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी भर बैठकीत कार्यकर्त्यांना खुली ऑफरच दिली आहे. प्रत्येक शहराची जबाबदारी त्या ठिकाणच्या मोठ्या नेत्यावर देण्यात आलीय. जो चांगलं नियोजन करेल त्याला बक्षिस देण्यात येईल, असंही यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा :

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनीही सोडली ठाकरेंची साथ; शिंदेच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक; तोडगा न निघाल्यास मोर्चेकरी घेणार ‘हा’ निर्णय

महाराष्ट्राचं बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…; विधानसभेच्या पायऱ्यांवर मविआची जोरदार घोषणाबाजी

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी