32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयराज्यातील वाहतूकदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील वाहतूकदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

टीम लय भारी

मुंबई : कोविड काळात आर्थिक संकटात असलेल्या वाहतूकदारां संदर्भात योग्य तो तोडगा काढला जाईल. वित्त व परिवहन विभागाला या संदर्भात निर्देश देण्यात  येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, व बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली होती. या वेळी ते बोलत होते (Uddhav Thackeray, directs to solve problems of transporters in the state).

यावेळी राज्यातील शहरांमध्ये बसेस व ट्रक्स यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ बनवण्यासाठी नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील. त्याचबरोबर योग्य ते नियोजन करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच चेक पोस्टच्या ठिकाणी ट्रॅमा केअर सेंटर उभारण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ईडी, सीबीआय, एनसीबीला जम्मू काश्मीरला पाठवा : संजय राऊत

…तेव्हा भाजपाने हे आव्हान स्वीकारण्याची मर्दानगी दाखवायला हवी; शिवसेनेचा हल्लाबोल

कोविडमुळे वाहतूकदार आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे वार्षिक मोटार वाहन करात सूट मिळणे, व्यवसाय करात सूट मिळणे, शाळा व धार्मिक स्थळांच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा मोटार कर पूर्ण माफ करणे, राज्यभरात वाहने व बसेस थांबण्यासाठी पार्किंग जागा उपलब्ध करणे ,  कामगार वाहतूक करणाऱ्या वातानुकूलित बसेसची कर कमी करणे, जड व अवजड वाहनांना राज्यातील प्रमुख शहरांत10 ते 16 तास करण्यात आलेली प्रवेश बंदी उठविणे, कालबाह्य प्रलंबित वाहतूक केसेस रद्द कराव्यात, सार्वजनिक सेवा वाहनाच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार कमी करणे, अशा मागण्या महासंघाने केल्या.

पंखात बळ भरणारे ‘ऑल इज वेल’ पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला

Will Maharashtra Relax Covid Curbs After Diwali? Uddhav Thackeray’s Meet With Task Force Today Generates Buzz

Maratha Reservation

या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री, अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी