32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमुंबईउध्दव ठाकरेंनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

उध्दव ठाकरेंनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

टीम लय भारी

मुंबई: संजय राऊत यांना ईडीने अटक केली. आज माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये उध्दव ठाकरेंनी भाजपच्या हुकूमशाहीवर हल्ला चढवला. तसेच संजय राऊत माझा जवळचा मित्र आहे. तो लढेल. घाबरणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

भाजपला प्रादेश‍िक पक्ष संपवायचे आहेत. भाजपचे कारस्थान आहे असे म्हणून जे.पी.नड्डा यांनी पाटणा येथे केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. भाजपचे हे सूड बुध्दीचे राजकारण जनता बघत आहे. आता सर्व जनतेनी विचार करायची वेळ आली आहे. हिंदूमध्ये फुट पाण्याचे काम भाजप करत आहे. राजकारण हे बुध्दीबळावर चालतं. मात्र इथे केवळ बळाचा वापर केला जात आहे. शक्तीचा वापर केला जात आहे. तुमचे विचार जनतेला कळून चुकले आहे. जनताच बघून घेईल. तुम्ही मजा घेत आहात घ्या असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

यावेळी त्यांनी दुसऱ्या महायुध्दाच्या वेळचे हिटलरचे उदाहण दिले. सगळया जगाला वाटत होतं की, हिटलरच जिंकणार परंतु हिटलरने बॉम्ब टाकला की, डेव्हीड लो हे एक कार्टून काढायचे. त्या दिवशी त्याचा पराभव झालेला असायचा. हिटलरने डेव्हीड लो यांना पकडून आणायचे आदेश दिले होते. त्याच कार्टून कलाकारांना बाळासाहेब ठाकरेंनी गुरू मानले होते.

संजय राऊत यांच्याविषय बोलतांना ते म्हणाले की, तो बाळा साहेबांचा असली शिवसैनिक आहे. संजय राऊत यांचा मला अभ‍िमान आहे. माझ्या सोबत आहेत ते दमदार आहेत. इमानदार आहेत. विरोधकांना चिरडून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काळ नेहमी बदलत असतो. कोश्यारींचे पोटातलं ओठावर आले. आज भाजपचं पोटातलं ओठावर आलं. तुम्हाला लोकशाही नको असून, हुकूमशाही हवी आहे. तुमच्याकडे बळ आहे. पण दिवस फिरतात असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला.

हे सुध्दा वाचा :

उद्धव ठाकरे यांनी घेतली राऊतांच्या कुटुंबियांची भेट

VIDEO : राऊतांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचा आनंद गगनात मावेना…

शिवसेना संपणार, फक्त भाजप राहणार; जे. पी. नड्डांचा दावा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी