30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे यांनी घेतली राऊतांच्या कुटुंबियांची भेट

उद्धव ठाकरे यांनी घेतली राऊतांच्या कुटुंबियांची भेट

टीम लय भारी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना शिवसेना पक्ष आणि आपण स्वत: संजय राऊत यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने अधिक चौकशीसाठी संजय राऊत यांना काल मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. या अटकेनंतर शिवसेनेने निदर्शने करीत संजय राऊत यांना पाठींबा दर्शवला आहे. यानंतर ठाकरेंनी राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

पत्राचाळ घोटाळ्याच्या चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीकडून याआधी दोनदा समन्स बजावण्यात आले होते परंतु अधिवेशनाचे कारण देत राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले. यानंतर ईडीने मोठी कारवाई करत चौकशीसाठी थेट संजय राऊत यांचे घर गाठले आणि काल उशीरा त्यांना अटक केली.

ज्यावेळी राऊत यांना अटक करण्यात आली त्यावेळी त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. अगदी भावनाशील वातावरणात औक्षण करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर खिडकीतून निरोप देताना संजय राऊत यांच्या मातोश्रींना हात हालवून तुम्ही काळजी करू नका म्हणून शिवसैनिकांनी धीर दिला. शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत अटकेच्या वेळी मात्र भावनाशील झाले ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उद्धव ठाकरे यांनी घेतली राऊतांच्या कुटुंबियांची भेट

 

दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली. राऊत यांच्या मातोश्री, पत्नी वर्षा राऊत, दोन्ही मुली यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. ही वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असल्याचे यावेळी सूत्रांकडून सांगण्यात आले. या भेटीत उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच शिवसेना आणि आपण स्वत: तुमच्या पाठिशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार ही भेट अवघ्या दहा मिनिटांचीच होती. भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे तात्काळ मातोश्रीकडे रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राऊत कुटुंब खिडकीत आले होते.

हे सुद्धा वाचा…

वाचा : संजय राऊत यांच्या अटकेचा घटनाक्रम

संजय राऊत यांच्यानंतर ईडीचा रोख उद्धव ठाकरेंकडे? निलेश राणे यांचे मोठे विधान

शिवसेना संपणार, फक्त भाजप राहणार; जे. पी. नड्डांचा दावा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!