27 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरराजकीयShiv Sena : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घेणार गटप्रमुखांचा मेळावा

Shiv Sena : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घेणार गटप्रमुखांचा मेळावा

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षप्रमुख हे मेळावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून गटप्रमुखांचे मेळावे कधी घेण्यात येणार ? हे अद्यापही घोषित झालेले नसले तरी पक्षाला बळकटी देण्यसाठी लवकरच उद्धव ठाकरे हे गटप्रमुखांचे सुद्धा मेळावे घेणार आहेत.

शिवसेनेला (Shiv Sena) राज्यात मोठे खिंडार पडल्यानंतर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून पक्ष बांधणीचे काम सुरु करण्यात आले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठले. यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला. परंतु यामुळे आता उद्धव ठाकरे हे पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ते यांच्याशी स्वतः जाऊन संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता लवकरच उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या गट प्रमुखांचा सुद्धा मेळावा लवकरच घेणार आहेत. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षप्रमुख हे मेळावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून गटप्रमुखांचे मेळावे कधी घेण्यात येणार ? हे अद्यापही घोषित झालेले नसले तरी पक्षाला बळकटी देण्यसाठी लवकरच उद्धव ठाकरे हे गटप्रमुखांचे सुद्धा मेळावे घेणार आहेत.

येत्या काही महिन्यात कधीही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे लवकरच गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करणार आहेत. गटप्रमुख हे शिवसेनेमधील लहान पद असले तरी या पदावर असणारी व्यक्ती हि पक्षातील महत्वाचा भाग असते. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्याकडून गटप्रमुखांना संबोधित करण्यात येणार आहे. यामुळे पहिल्यांदाच गटप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद साधण्यात येणार आहेत.

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये राहिलेल्या काही नेत्यांकडून शिवसेनेला मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रभागामध्ये ज्यांचे सर्वाधिक प्राबल्य असते अशा गटप्रमुखांचाच आता उद्धव ठकरे यांनी मेळावा आयोजित केला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी 30 गटप्रमुख असतात. गटप्रमुखांचे आपल्या प्रभागात उत्तम वर्चस्व असते. प्रभागामध्ये शाखाप्रमुख हे महत्वाचे पद असले तरी, शाखाप्रमुखापेक्षा गटप्रमुखालाच प्रभागातील अधिक लोक ओळखत असतात.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून महत्वाचे नेते, आमदार जरी बाहेर पडत असले तरी, उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना धरून ठेवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सामान्य व्यक्ती शिवसेनेच्या उच्च पदावर दिसून आला तर यांत कोणतीही मोठी गोष्ट नसणार. कारण आता सामान्य शिवसैनिकालाच आमदार-खासदार बनवण्याचा निश्चय उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : मोदींच्या ‘अच्छे दिन’वरून शरद पवार झाले आक्रमक

Shivsena Vs Shindesena : ‘धनुष्यबाण’ ही निशाणी शिंदे गटालाच मिळणार, शिंदे गटाचे ठाम मत

Mamata Banerjee : मला अटक करुन दाखवा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाजपला खुले आव्हान

दरम्यान, दसरा मेळाव्यावरून आधीच शिवसेना आणि शिंदेसेना यांच्यात जुंपलेली पाहायला मिळत आहे. पण त्याआधीच उद्धव ठाकरे यांच्याकडून गटप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मेळावा नेमका कोण घेणार ? याचा निर्णय अद्यापही होत नसला तरी, गटप्रमुखांच्या मेळाव्यात मात्र गटप्रमुखांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी