32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री म्हणाले, फलाटावर उभे राहिलो की आपण लोकलच्या आत आपोआप जातो

मुख्यमंत्री म्हणाले, फलाटावर उभे राहिलो की आपण लोकलच्या आत आपोआप जातो

टीम लय भारी :

मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चर्नी रोडला मराठी भाषा भवन आणि वडाळा येथे जीएसटी भवनचे भूमिपूजन होत असून ११२ या पोलिसांच्या नव्या हेल्पलाइनचे आणि मुंबईतील मेट्रो ७ व २ ए या दोन मार्गिकांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.एकूण चार प्रकल्पांचे उद्घाटन आज २ एप्रिल रोजी करण्यात आले. (Uddhav Thackeray’s comment on Metro)

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीए आयुक्त एस वी आर श्रीनिवास यांच्यासह अनेक मान्यवर व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोरोना नंतर निर्बंधमुक्तीचा आजचा पहिला दिवस,आजच्या चारही कार्यक्रमात मी पाहिलं, आवर्जुन मी आणि उपमुख्यमंत्री यांनी मास्क घातला आहे बाकी कुणीच नाही   मास्क सक्ती नसली तरी मुक्ती नाही हे ही आपण लक्षात घेतलं पाहिजेसंकट टाळण्यासाठी मास्क घाला.  आजचा दिवस मुंबईकरांसाठी आनंदाचा आहे. मी आजच्या चार कार्यक्रमांपैकी दोन ऑनलाईन कार्यक्रम राष्ट्रवादीकडील विभागाचे केले आणि दोन कार्यक्रमात प्रत्यक्षात आलो ते शिवसेनेचे होते. लगेच यावरून बोलायला सुरुवात होईल. पण त्यांना सांगतो आमची लाईन एक आणि बरोबर आहे ती वाकडी तिकडी कधी जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

विस्तारत जाणारी मुंबई, अथांग सागर आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या ही मुंबईची आजची अवस्था आहे. त्यामुळे सुविधांवर ताण येत नक्कीच येत आहे. इमारतींचा एफएसआय वाढवता येतो पण रस्त्यांचा कसा वाढवायचा आहे. त्यातही अंथरूण कमी असलं तरी हातपाय पसरण्याचा प्रयत्न करतोय.गेल्या साठ वर्षात मी बदलती मुंबई पहात आलो.लहानपणी बाळासाहेब आणि माँ ने मला ट्रामने फिरवलं. ट्राम गेल्याचे दु:ख झाले. पण रिक्षा, टॅक्सी, लोकल, बेस्ट आली आता मेट्रोही.लोकलची अशी स्थिती की फलाटावर उभं राहिलं की आपण आपोआप लोकलमध्ये जातो आणि बाहेर येतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

गर्दी वाढली पण सुविधा किती द्यायच्या.यापूर्वी अनेक प्रकल्पाचे नारळ फुटले, जलपुजन झालं पण प्रकल्प प्रत्यक्षात आले नाहीत पण त्यात  जे केले नाही ते आम्हीच केलं म्हणण्याची नवी साथ आलीय. अशा रुग्णांकडे लक्ष देण्याची गरज नाही.आम्ही काय करतो, तुम्ही काय करता, हे राज्यातील जनता पहात आहे. कौरवांचे चाळे बघून गप्प राहणारा धृतराष्ट्र हा महाराष्ट्र नाही, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.तुम्ही रात्रीतून झाडं कापली, सगळ्या मुंबईकरांनी पाहिली ना ,पर्यावरण संतुलित विकास करण्याला आमचं प्राधान्य आहे.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळ येऊ नये ही माझ्यासाठी विकासाची संकल्पना आहे. मेट्रोच्या कामासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्या सगळ्यांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद. हे काम करतांना ज्या अडचणी आल्या तरीही आपण कामं केलं, त्याचे फोटो सगळ्यांना दाखवा, त्यांनाही कळू देत काम करतांना किती आणि कशा अडचणी आल्या. मुंबईवरचं प्रेम कामातून दिसावं. बुलेट ट्रेनसाठी आग्रह ते धरणार. मुंबईकरांवर प्रेम आहे तर कांजूरमार्गाची जागा मेट्रोसाठी का नाही देत, बदलापूरपर्यंत मेट्रोने जाऊ शकू, मुंबईच्या पंपीग स्टेशनसाठी, धारावीच्या पुर्नविकासासाठी जागा मागतो ते देत नाहीत. का नाही हे काम मार्गी लावत, असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.

या सर्व विकास कामांचे श्रेय खऱ्या अर्थाने मुंबईकरांना आहे.मुंबईकर आणि महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाठकणा. तो आपण कायम ताठ ठेवण्याचे काम करूया. देशाच्या उत्पन्नात सर्वाधिक महाराष्ट्राचे योगदान पण महाराष्ट्राला परत काय मिळतं.महाराष्ट्राच्या हक्काचं मागत आहोत, भीक नाही मागत, ते नाकारण्याचे काम करू नका.तुमच्याही कामांना आम्हीही पुढे नेण्याचे काम करत आहोत. समृद्धी महामार्ग नागपूरहून पुढे गडचिरोलीला नेत आहोत  पहिली बुलेट ट्रेन राजधानी उपराजधानीला जोडणारी हवी होती,असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.महागाई कमी होत नाही, इंधन दर वाढत आहे असे अनेक प्रश्न आहेत, नागरिकांच्या या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या कामांवर होणाऱ्या आरोपांकडे लक्ष देऊ नये अस मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे.


हे सुद्धा वाचा :

Dilip Walse Patil rushes to meet Uddhav Thackeray, BJP says NCP is keen to get CM post

देवेंद्र फडणविसांनी मन मोठे केले, अन् अडचणीचा प्रश्न विचारला

‘मोदी सरकार’चे पितळ उघडे पाडण्यासाठी युवा सेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी